IPL 2023: आयपीएल यंदा लवकर आटोपण्याची शक्यता; काय आहे कारण?

बीसीसीआयकडून सध्यातरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
IPL 2023
IPL 2023Twitter/ @IPL
Published On

IPL 2023: क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल मोठी भेट असते. आयपीएल 2023 साठी आता क्रिकेटप्रेमी खूप उत्सुक दिसत आहेत. मिनी लिलावानंतर चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. मात्र आता चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

कारण यावेळी आयपीएल कमी दिवसांत उरकलं जाणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे 7 जूनपासून लॉर्ड्सवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु होणार आहे. (IPL 2023)

IPL 2023
IPL 2023: ठरलं तर! महेंद्रसिंग धोनीच्या जागी बेन स्टोक्स CSK चा कर्णधार? ख्रिस गेलने गेला महत्वाचा खुलासा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी आयपीएलचा 16वा सीझन 74 दिवसांऐवजी 60 दिवसांचा असेल. मात्र, बीसीसीआयने लीगच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. पण रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर यावेळी आयपीएल फक्त 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीतच खेळवले जाईल. (Cricket News)

महिला आयपीएल मार्चमध्ये होणार आहे. यानंतर बीसीसीआयकडे फक्त 60 दिवसांची विंडो उपलब्ध असेल. आता यावर बीसीसीआय काय निर्णय घेते हे पाहावे लागेल. सध्यातरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

IPL 2023
Boxing Day Test: 'बॉक्सिंग डे कसोटी' नेमका विषय काय? का आणि कधी सुरू झाले सामने? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

आयसीसीच्या नियमांनुसार, कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या सात दिवस आधी आणि नंतर कोणत्याही प्रकारची स्पर्धा आयोजित केली जाऊ शकत नाही. अशा स्थितीत 7 जून रोजी होणार्‍या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आयपीएलसाठी अडचणी निर्माण करू शकतो. बीसीसीआयकडे महिलांचे आयपीएल आणि आयपीएलसाठी एकूण 3 महिन्यांची वेळ आहे. आता सर्वांच्या नजरा आयपीएलच्या तारखांवर खिळल्या आहेत.

यंदाच्या आयपीएल मिनी लिलावात नवा इतिहास रचला गेला. या लिलावात सॅम कुरन आयपीएलमध्ये विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्सने त्याला 18.5 कोटी मोजून आपल्या संघाचा भाग बनवले. करन याआधीही आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com