
आयसीसीकडून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव सुरुच आहे. २०२४ मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसीकडून पुरस्कार दिले जात आहेत. अफगाणिस्तानच्या खेळाडूने इतिहासाला गवसणी घातली आहे.
अफगाणिस्तानच्या कुठल्याही खेळाडूला यापूर्वी कुठल्याही खेळाडूला आयसीसी प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकता आला नव्हता. आता अजमतुल्लाह उमरजईने हा पुरस्कार जिंकून इतिहासाला गवसणी घातली आहे. त्याचं नाव इतिहासाच्या पाणांवर कोरलं गेलं आहे.
अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज अजमतुल्लाह उमरजईने २०२४ मध्ये फलंदाजी करताना दमदार कामगिरी केली. त्याच्या कामगिरीची दखल घेत, आयसीसीने त्याला आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द ईयरचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने फलंदाजी करताना अफगाणिस्तानला अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.
त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २०२४ मध्ये फलंदाजी करताना ४१७ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना त्याने १७ गडी बाद केले. हा कारनामा त्याने केवळ १४ सामन्यांमध्ये करुन दाखवला. या धावा त्याने ५२.१२ च्या सरासरीने केल्या आहेत.
यापूर्वी अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानची टी-२० क्रिकेटर ऑफ द ईयर म्हणून निवड करण्यात आली होती. आता अजमतुल्लाह उमरजईने या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. यापूर्वी अफगाणिस्तानच्या कुठल्याही खेळाडूला असा कारनामा करता आला नव्हता.
त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर २०२१ मध्ये पदार्पण करणाऱ्या अजमतुल्लाह उमरजईने ३६ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ९०७ धावा केल्या आहेत. तर फलंदाजी करताना त्याने ३० गडी देखील बाद केले आहेत.
तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ४७ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला ३१ गडी बाद करता आले आहेत. तर फलंदाजी करताना त्याने ४७४ धावा चोपल्या आहेत.
अजमतुल्लाह उमरजईच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर तो पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. यापूर्वी तो गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसून आला होता. त्याने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४२ धावा केल्या असून ४ गडी बाद केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.