Australia Eliminated : टी २० वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठा उलटफेर; बलाढ्य ऑस्ट्रेलिया स्पर्धेतूनच बाद, झिम्बाब्वेची सुपर ८ मध्ये एन्ट्री

zimbabwe qualify super 8 icc t20 world cup : टी २० वर्ल्डकपमधून तगडा ऑस्ट्रेलिया संघ बाहेर झाला आहे. आयर्लंड आणि झिम्बाब्वे या दोन संघांमधील सामना पावसामुळं रद्द झाला. एकेक गुण मिळाल्याने झिम्बाब्वेचा संघ सुपर ८ मध्ये पोहोचला आहे.
टी २० वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठा उलटफेर; बलाढ्य ऑस्ट्रेलिया स्पर्धेतूनच बाद, झिम्बाब्वेची सुपर ८ मध्ये एन्ट्री
australia knocked out zimbabwe enter super 8 t20 world cupsaam tv
Published On

ICC पुरूष टी २० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात मोठा उलटफेर बघायला मिळाला. सर्वात तगडा संघ आणि विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्डकप स्पर्धेतूनच बाद झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाला पाणी पाजणाऱ्या झिम्बाब्वे संघानं सुपर ८ मध्ये एन्ट्री केली आहे.

आता सगळं नशिबावर अवलंबून आहे, असं म्हणणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाची नशिबानंही साथ सोडलीय. सर्वात तगडा संघ आणि विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला ऑस्ट्रेलिया संघ या स्पर्धेतूनच बाद झाला आहे. तर बलाढ्य ऑस्ट्रेलियाला गारद करणारा झिम्बाब्वेचा संघ सुपर ८ मध्ये पोहोचला आहे.

आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेत आज आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात ग्रुप बीमधील अत्यंत महत्वाचा सामना होता. या सामन्यावर ऑस्ट्रेलियाचं भवितव्य आणि वर्ल्डकप स्पर्धेतील पुढील प्रवास अवलंबून होता. श्रीलंकाविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानंही नशिबावर सगळं सोडलं होतं. पण नशिबानंही साथ दिली नाही. ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा असा हा सामना पावसामुळं रद्द झाला. ऑस्ट्रेलियाच्या नशिबावरही पावसानं पाणी फेरलं.

पल्लेकेलेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात लढत होती. पण पावसाच्या पाण्यामुळं एकही चेंडू फेकला गेला नाही. पावसामुळं हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकही चेंडू न फेकता या सामन्याचा निकाल लागला. तांत्रिकदृष्ट्या कोणत्याही एका संघाला विजय मिळाला नाही. पण या परिस्थितीत सर्वात मोठं नुकसान हे ऑस्ट्रेलियाच्या संघाचं झालं. तर झिम्बाब्वे संघाला फायदाच झाला. त्यांना सुपर ८ मध्ये स्थान मिळालं.

या सामन्याच्या निकालानंतर ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड हे दोन्ही संघ स्पर्धेबाहेर झाले. झिम्बाब्वेच्या संघानं तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. झिम्बाब्वेच्या संघाचे पाच गुण झाले. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका संघाने तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून सहा गुण मिळवले आहेत. हा संघ आधीच क्वालिफाय झाला आहे.

टी २० वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठा उलटफेर; बलाढ्य ऑस्ट्रेलिया स्पर्धेतूनच बाद, झिम्बाब्वेची सुपर ८ मध्ये एन्ट्री
T20 World Cup 2026 Points Table: टीम इंडिया सुपर-८ मध्ये दाखल; पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील भवितव्य धोक्यात!

आयर्लंड संघाने ४ सामने खेळले असून, त्यातील एका सामन्यात विजय मिळवला. तर दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे एकूण तीन गुण आहेत. नेट रन रेटमुळं ते मागे पडले. तर ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांत फक्त एक विजय मिळवला. दोन पराभव झाले. त्यांचे २ गुण आहेत. ओमान संघाला तिन्ही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला.

टी २० वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठा उलटफेर; बलाढ्य ऑस्ट्रेलिया स्पर्धेतूनच बाद, झिम्बाब्वेची सुपर ८ मध्ये एन्ट्री
Sri Lanka vs Australia T20 WC: श्रीलंकेच्या धुरंधरांनी कांगारूंना रडवलं; वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलियानं गाशा गुंडाळला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com