Asian Games 2023: पुरुषांच्या 4x400 मीटर रिलेमध्ये भारतानं जिंकलं सुवर्ण पदक

Asian Games 2023: आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारतीय पुरुष रिले संघानं हाँगझोऊ येथे इतिहास रचला.
Asian Games
Asian GamesSocial media
Published On

Indian Mens Team Wins Gold 4x400m Relay :

आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारतीय पुरुष रिले संघानं हाँगझोऊ येथे इतिहास रचला. या संघानं 4x400 मीटर रिलेच्या अंतिम फेरीत सुवर्ण पदक जिंकले. भारतानं कतार, जपान आणि इराकपेक्षा जलद वेळेत ३:०३:८१ मिनिटांनी अंतर पार करत सुर्वण पदक मिळवलं.

बेल्जियममध्ये नुकत्याच पार पडलेल्या अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियन्समध्ये जेकब, अनस, राजेश रमेश आणि मुहम्मद अजमल वरियाथोडी यांच्या संघाने हे सुवर्ण पदक मिळवलंय. या संघानं भारताच्या नावावर एरिया रेकॉर्ड बनलाय. भारताच्या संघानं दुसऱ्या फेरीमध्ये ३:२७:८५ वेळेत ही शर्यत पार केली.तर बहरिनच्या संघानं ३:२७:६५ वेळेत अंतर पार करत अव्वलस्थान घेण्याचा काटोकाट प्रयत्न केला. तर श्रीलंकेच्या संघानं कांस्य पदकावर दावा ठोकत ही शर्यत ३:३०:८८ पार केली.

तर महिला संघानं ४०० मीटरच्या रिले शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे. गेल्या सहावेळा भारतानं या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलंय परंतु यावेळी भारताला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. विथ्या रामराज, ऐश्वर्या मिश्रा, प्राची, सुभा व्यंकटेशन या संघानं रौप्यपदक पटकावलं.

Asian Games
Asian Games 2023: मराठमोळ्या ओजसने इतिहास रचला; तिरंदाजीत भारतासाठी पटकावलं पहिलंच गोल्ड मेडल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com