Asia Cup 2025: आशिया कपमध्ये मोठा बदल, भारत- पाकिस्तान सामन्याचंही टायमिंग बदललं, नवीन अपडेट आली समोर

Asia Cup 2025 Timing Changed: आशिया कप सुरु होण्याआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारत- पाकिस्तानसह अनेक सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
Asia Cup 2025
Asia Cup 2025saam tv
Published On

आशिया कप स्पर्धा ९ सप्टेंबर २०२५ रोजी सुरु होणार आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत आशिया खंडातील ८ संघ आमने- सामने येणार आहे. पण ही स्पर्धा सुरु होण्याच्या काही दिवसाआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. आशिया कपच्या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हे सामने यूएईमध्ये ६ वाजता सुरु होणार होते. परंतु आता १९ पैकी १८ सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार हे सामने कधी सुरु होतील, जाणून घ्या.

आशिया कप सामन्यांच्या वेळापत्रकात बदल

आशिया कप २०२५ सुरु होण्यासाठी काही दिवस उरले असता, १९ पैकी १८ सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. हे सामने UAE मध्ये संध्याकाळी ६ वाजता सुरू होणार होते.सप्टेंबरमधील कडक उन्हाळा टाळण्यासाठी आता सामन्याची वेळ अर्ध्या तासाने वाढवून ६:३० करण्यात आली आहे. खेळाडूंना उष्णतेपासून थोडा आराम मिळावा म्हणून सामने अर्धा तास उशिराने सुरु होतील.कारण या महिन्यात अरब देशांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा जास्त असते. क्रिकेट मंडळांच्या विनंतीनंतर, प्रसारकांनी सामन्यांच्या वेळेत बदल करण्यास मान्यता दिली. १५ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे होणाऱ्या यूएई आणि ओमान यांच्यातील सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.३० वाजता खेळवला जाईल.

Asia Cup 2025
Harbhajan-Sreesanth Slapgate Controversy: हरभजनने श्रीसंतला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ १७ वर्षांनी व्हायरल, नेमकं मैदानात काय घडलं होतं? Original Video

भारतीय वेळेनुसार सामने कधी सुरु होतील?

आशिया कप हा टी-२० स्वरुपात खेळवला जाणार आहे. आधी हे सामने भारतीय वेळेनुसार ७.३० वाजता सुरु होणार होते. परंतु नवीन वेळापत्रकानुसार, सामन्याची वेळ अर्ध्या तासाने पुढे ढकलण्यात आली आहे. जेणेकरुन हे सामने भारतीय वेळेनुसार ८ वाजता सुरु होईल. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक सामनाही खेळवला जाणार आहे. हा ब्लॉकबस्टर सामना १४ सप्टेंबर रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

आशिया कप २०२५चा T-20 फॉरमॅट

आशिया कप क्रिकेट स्पर्धा २०२५ ९ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे तर फायनल २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. आशिया कप २०२५ चे सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबू धाबी आणि दुबई या दोन शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. गट A मध्ये भारत, पाकिस्तान, UAE आणि ओमान यांचा समावेश आहे. तर गट B मध्ये हाँगकाँग, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. यावेळी आशिया कपचे सामने T20 स्वरूपात खेळवले जातील.

Asia Cup 2025
Rohit Sharma ODI Retirement: रोहित शर्माला वनडे क्रिकेटमधून रिटायर करण्याचा प्लान; माजी खेळाडूचा खळबळजनक दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com