IND Vs PAK : टीम इंडियात मोठे बदल! हार्दिक, अर्शदीप बाहेर; कोणाला मिळाली संधी? पाहा Playing XI

Asia Cup 2025 IND Vs Pak Final : आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान हे दोन संघ तिसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Asia Cup 2025 IND Vs Pak Final
Asia Cup 2025 IND Vs Pak Finalx
Published On

Asia Cup 2025 Final : आशिया कप २०२५ मधील अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले आहेत. सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पाकिस्तानचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

भारताची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

पाकिस्तानची प्लेईंग ११ -

साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान अली आगा, हुसैन तलत, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद

Asia Cup 2025 IND Vs Pak Final
Team India च्या क्रिकेटपटूंना ED चा दणका! मनी लाँड्रिंग प्रकरणी मालमत्ता जप्त, कोणा-कोणावर कारवाई?

सूर्यकुमार यादवने टॉस जिंकत पाकिस्तानच्या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. टॉस झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कर्णधाराकडे दुर्लक्ष केले. टॉस झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने प्लेईंग ११ बाबत माहिती दिली. या सामन्यामध्ये हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह यांना विश्रांती देण्यात आली आहे.

दुखापतीमुळे हार्दिकचे न खेळणे अपेक्षित होते. पण अर्शदीप सिंह प्लेईंग ११ मध्ये न सामील केल्याने सगळ्यांना धक्का बसला. हार्दिक पंड्याच्या जागी रिंकू सिंह, तर अर्शदीप सिंहच्या जागी शिवम दुबे खेळणार आहे. पाकिस्तानच्या संघात एकही बदल नाहीये.

पॉवर प्लेमध्ये जसप्रीत बुमराह ३ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणार आहे. बुमराह व्यतिरिक्त दुसऱ्या एकाही वेगवान गोलंदाजाला संघाला संधी देण्यात आली आहे. संघात उरलेले सर्व फिरकीपटू आहेत. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने प्रयोग केल्याचे पाहायला मिळत आहे.

आशिया कप २०२५ मध्ये १४ सप्टेंबर रोजी पहिल्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने सात विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर सुपर ४ मध्ये २१ सप्टेंबर रोजी हे दोन संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात खेळले होते. हा सामना देखील भारताने जिंकला. आता आशिया कप २०२५ च्या शेवटच्या आणि अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा ही लढत पाहायला मिळत आहे.

Asia Cup 2025 IND Vs Pak Final
Asia Cup 2025 : एक चूक अन् टीम इंडियाचा पराभव निश्चित! IND vs Pak मध्ये भारताला 'ही' गोष्ट करावी लागेल फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com