Asia Cup 2022 : पहिल्याच सामन्यात श्रीलंका पराभूत; अफगाणिस्तानची विजयी सुरूवात

पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला
Asia Cup 2022 Srilanka vs Afghanistan
Asia Cup 2022 Srilanka vs AfghanistanSaam TV
Published On

नवी दिल्ली : आशिया चषक 2022 (Asia Cup) स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने दमदार सुरूवात केली. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात (Cricket) अफगाणिस्तानने श्रीलंकेचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. पहिल्या २ षटकात ३ गडी गमावल्यानंतर श्रीलंकेचा संघ फक्त १०६ धावांवर गारद झाला. श्रीलंकेनं दिलेलं आव्हान अफगाणिस्तानने केवळ १० षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. (Asia cup 2022 SL vs AFG Live Score)

Asia Cup 2022 Srilanka vs Afghanistan
Asia Cup 2022 : १२ चेंडूतच श्रीलंकेचा संघ बॅकफूटवर; अफगाणिस्तानची दमदार सुरूवात

१०६ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने जोरदार सुरुवात केली. पहिल्या ६ षटकांनंतर संघाने बिनबाद ८३ धावा केल्या होत्या. हजरतुल्ला झझाई आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी आक्रमक फलंदाजी केली. गुरबाजने १८ चेंडूत ४० धावा केल्या, हसरंगाने त्याला बाद केले. त्यानंतर इब्राहिम झद्रान 13 चेंडूत 15 धावा करून धावबाद झाला. मात्र तोपर्यंत संघाला आणखी फक्त 3 धावा करायच्या होत्या. संघाने 10.1 षटकांत 2 गडी राखून लक्ष्य गाठले. हजरतुल्ला झाझाई 37 आणि नजीबुल्ला जद्रान 2 धावांवर नाबाद राहिले.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या 12 चेंडूतच श्रीलंका संघाचे टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज माघारी परतले. पहिल्याच षटकात अफगाणिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज फजल हक फारुकीने श्रीलंकेला सलग दोन चेंडूंत दोन धक्के दिले. (Asia cup 2022 Latest Updates)

Asia Cup 2022 Srilanka vs Afghanistan
Asia cup: आशिया चषकावर आठव्यांदा नाव कोरण्यासाठी टीम इंडिया सज्ज; यंदा 'हे' विक्रम मोडण्याची नामी संधी

फारुकीने पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज कुसल मेंडिसला एलबीडब्ल्यू केलं. यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने चारिथ असलंकालाही माघारी पाठवलं. असलंकाला खातेही उघडता आले नाही. यानंतर दुसऱ्याच षटकात श्रीलंकेला तिसरा धक्का बसला.

नवीन-उल-हकने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेचा विस्फोटक फलंदाज पथुम निशांकाला बाद केलं. दरम्यान, अफगाणिस्तानने भेदक गोलंदाजी करत श्रीलंकेला १०६ धावांवर रोखलं. श्रीलंकेकडून राजपक्षे याने ३८ तर करुणारत्नेने ३१ धावा केल्या. दोघांव्यतिरिक्त श्रीलंकेच्या कुठल्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. अफगाणिस्तानकडून फजल हक फारुकीने ३ बळी घेतले. याशिवाय मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी यांना २-२ बळी मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com