Asia Cup 2022 : १२ चेंडूतच श्रीलंकेचा संघ बॅकफूटवर; अफगाणिस्तानची दमदार सुरूवात

आशिया चषक 2022 स्पर्धेची सुरूवात झाली
Asia cup 2022, SL vs AFG live
Asia cup 2022, SL vs AFG liveTwitter/@ACB
Published On

नवी दिल्ली : आशिया चषक 2022 स्पर्धेची सुरूवात झाली आहे. दुबईत श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिला टी-20 सामना सुरू आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या 12 चेंडूतच श्रीलंका संघाचे टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज माघारी परतले.

पहिल्याच षटकात अफगाणिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज फजल हक फारुकीने श्रीलंकेला सलग दोन चेंडूंत दोन धक्के दिले.फारुकीने पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज कुसल मेंडिसला एलबीडब्ल्यू केलं. फारुकीने टाकलेला चेंडू मिडल आणि लेग स्टंपवर होता.

Asia cup 2022, SL vs AFG live
Asia cup: आशिया चषकावर आठव्यांदा नाव कोरण्यासाठी टीम इंडिया सज्ज; यंदा 'हे' विक्रम मोडण्याची नामी संधी

कुशल मेंडिसने तो स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू अतिशय वेगाने आत आला आणि कुशल मेंडिस LBW झाला. अशाप्रकारे सामन्याच्या पाचव्या चेंडूवरच श्रीलंकेला पहिला धक्का बसला. मेंडिसला केवळ 2 धावा करता आल्या.

यानंतर फारुकीने पुढच्याच चेंडूवर चारिथ असलंकालाही एलबीडब्ल्यू आऊट केले. असलंकाला खातेही उघडता आले नाही. यानंतर दुसऱ्याच षटकात श्रीलंकेला तिसरा धक्का बसला. नवीन-उल-हकने या षटकात पहिल्या पाच चेंडूत दोन धावा दिल्या. पण, शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेचा विस्फोटक फलंदाज पथुम निशांकने मिडऑनच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू यष्टिरक्षक रहमानउल्ला गुरबाजच्या हातात गेला.

Asia cup 2022, SL vs AFG live
'आम्ही घाबरणार नाही..', रोहित शर्माने पाकविरुद्धच्या विजयाचा सांगितला फॉर्म्युला

अफगाणिस्तान संघाने यावर जोरदार अपील केले. पण पंचांनी आऊट दिलं नाही. अशा परिस्थितीत डीआरएस घेण्यात आला आणि येथे घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. थर्ड अंपायरने अनेक वेळा रिप्ले पाहिला आणि स्निकोमीटरची मदत घेतली.

स्निकोमीटरमध्ये कोणतीही मोठी हालचाल झाली नाही ज्यामुळे चेंडू बॅटला लागला. जेव्हा चेंडू बॅटमधून गेला तेव्हा खूप हलकी हालचाल झाली. ज्याने चेंडू कधीच आदळला असे मानले जात नव्हते. परंतु थर्ड अंपायर जयरामन मदनगोपाल यांनी तो फेटाळून लावला आणि बाद घोषित केले. अशाप्रकारे पहिल्या 12 चेंडूतच श्रीलंकेचे टॉप ऑडरमधील फलंदाज माघारी परतले.

दरम्यान, अफगाणिस्तानने भेदक गोलंदाजी करत श्रीलंकेला 106 धावांवर रोखलं. श्रीलंकेकडून राजपक्षे 38 तर करुणारत्नेने 31 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फजल हक फारुकीने ३ बळी घेतले. याशिवाय मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी यांना २-२ बळी मिळाले. 106 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरूवात दमदार झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा अफगाणिस्तानने 8 षटकांत 1 बाद 99 धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com