Ashish Nehra: भडकला ना राव...लाईव्ह सामन्यात आशिष नेहरा संतापला; नेमकं काय घडलं? - VIDEO

Ashish Nehra Got Angry: गुजरात टायटन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा संघातील फलंदाजांवर भडकला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
Ashish Nehra: भडकला ना राव...लाईव्ह सामन्यात आशिष नेहरा संतापला; नेमकं काय घडलं?
ashish nehratwitter
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. मुंबईला आपल्या पहिल्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर गुजरातला पंजाबकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिला सामना गमावलेल्या मुंबईसमोर हा सामना जिंकण्याचं आव्हान होतं. मात्र हा सामनाही मुंबईने गमावला आहे. गुजरातने हा सामना जिंकला असला तरीदेखील गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा खालच्या फळीतील फलंदाजांवर भडकताना दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ashish Nehra: भडकला ना राव...लाईव्ह सामन्यात आशिष नेहरा संतापला; नेमकं काय घडलं?
MI Vs GT IPL 2025 Live : मुंबईची दुसरी मॅच पण देवाला? चेन्नईनंतर गुजरातनं पाजलं पराभवाचं पाणी

कुल माईंडेड आशिष नेहरा आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र यावेळी तो लाईव्ह सामन्यात फलंदाजांवर भडकताना दिसून आला. या सामन्यात गुजरातचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. दरम्यान १९ व्या षटकात नेहरा फलंदाजांवर भडकताना दिसून आला.

Ashish Nehra: भडकला ना राव...लाईव्ह सामन्यात आशिष नेहरा संतापला; नेमकं काय घडलं?
IPL 2025 : 'डोसा.. इडली.. सांबर.. चटणी..' CSK च्या डिजेने उडवली RCB च्या खेळाडूची खिल्ली, ट्रोलिंग मागचं नेमकं कारण काय?

मुंबई इंडियन्स संघाकडून दीपक चाहर गोलंदाजी करत होता. त्यावेळी षटकातील पहिल्याच चेंडूवर राहुल तेवतिया सुस्त असल्याचं दिसून आलं. तो क्रिझमध्ये परत येऊ शकला असता इतक्यात हार्दिक पंड्याने शानदार थ्रो केला आणि त्याला बाद केलं. त्यामुळे त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं.

गुजरातचा संघ शेवटी मजबूत स्थितीत होता, पण एक मोठा धक्का बसल्यानंतर पुढच्याच चेंडूवर रुदरफोर्ड देखील मोठा फटका खेळण्याचा नादात बाद होऊन माघारी परतला. लागोपाठ २ धक्के बसल्यानंतर आशिष नेहरा आपल्या रागावर ताबा ठेवू शकला नाही. तो डगआऊटमधूनच खेळाडूंवर ओरडताना दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गुजरातचा शानदार विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात गुजरातचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. गुजरातला २० षटकअखेर ८ गडी बाद १९६ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. मुंबईला १६० धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईने हा सामना ३६ धावांनी गमावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com