Who Is Sania Chandok: अर्जुनने बालपणीच्या मैत्रिणीसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; तेंडुलकरांची होणारी सून सानिया चंडोक आहे तरी कोण?

Arjun Tendulkar engagement: सध्या सोशल मीडियावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अर्जुनचा साखरपुडा त्याची बालपणीची मैत्रीण सानिया चांदोक हिच्यासोबत एका खासगी समारंभात पार पडला आहे.
Who Is Sania Chandok
Who Is Sania Chandoksaam tv
Published On

‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर याच्या घरी लवकरच लग्नाचा बार उडणार आहे. सचिनचा एकुलता एक मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मात्र अर्जुनची होणारी बायको नेमकी कोण मुलगी आहे जी सचिनची सून होणार आहे याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. रिपोर्ट्सनुसार, अर्जुन तेंडुलकर होणारी पत्नी ही बालपणीची मैत्रिण आणि लाँग-टाईम गर्लफ्रेंड सानिया चंडोक आहे.

बुधवारी म्हणजेच 13 ऑगस्ट 2025 रोजी या गोंडस जोडप्याचा साखरपुडा पार पडला आहे. अशी अपेक्षा आहे की लवकरच ते विवाहबंधनात अडकतील.

Who Is Sania Chandok
Asia Cup 2025 India Squad: श्रेयस अय्यर पास; हार्दिक पांड्या वेटिंगवर तर सूर्या दादाबाबत सस्पेन्स

प्रसिद्द उद्योजक रवि घई यांची नात आहे सानिया चंडोक

सानिया चंडोक ही देशातील प्रसिद्ध उद्योगपती रवि घई यांची नात आहे. घई कुटुंब फाईव्ह स्टार इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स आणि ब्रुकलिन क्रीमरी सारख्या बिझनेसशी संबंधित आहे. ब्रुकलिन क्रीमरी हा हेल्थ-फ्रेंडली आइसक्रीम आणि फ्रोजन डेसर्ट ब्रँड आहे. याशिवाय ‘ग्रॅविस गुड फूड्स’ हा व्यवसायही घई कुटुंबाचा आहे.

जरी सानिया श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातून आली असली तरी ती स्वतः एक बिझनेस वुमन आहे. सध्या ती मुंबईतील ‘मिस्टर पॉज’ नावाच्या प्रीमियम पाळीव प्राणी सैलून, स्पा आणि स्टोअरची संस्थापक आहे. हा व्यवसाय तिच्या मेहनती स्वभाव आणि वेगळ्या दृष्टिकोनाचं उदाहरण मानलं जातं.

Who Is Sania Chandok
Rohit Sharma : आशिया कपआधी रोहित शर्मासाठी गुड न्यूज; फॅन्स छातीठोकपणे म्हणणार, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण

सानिया चंडोक हिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधू पदवी घेत शिक्षण पूर्ण केलं आहे. ती अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरची देखील अतिशय जिवलग मैत्रीण आहे. सोशल मीडियावर त्या दोघींचे अनेक फोटोही आहेत.

Who Is Sania Chandok
Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

पाळीव प्राण्यांवर विशेष प्रेम

सानियाला पाळीव प्राणी आणि त्यांची काळजी घेण्याची विशेष आवड आहे. तिने प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. तिचं मत आहे की प्रत्येकाने प्राण्यांबद्दल प्रेम आणि सहानुभूती ठेवली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com