IPL 2025 : प्लेऑफच्या स्पर्धेतून 'या' ४ टीम्स पूर्पणपणे बाहेर? पाहा कसं आहे पॉईंट्स टेबलचं समीकरण

IPL 2025 Points Table: आपयीएलची यंदाची स्पर्धा आता मध्यावर आली आहे. यावेळी कोणत्या ४ टीम्स प्लेऑफ गाठणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. असातच ४ अशा टीम आहेत ज्या जवळपास प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहेत.
IPL 2025 Playoff Rules
IPL 2025 Playoff Rulessaam tv
Published On

रविवारी आयपीएलमध्ये दोन सामने खेळवण्यात आले. यामधील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात झाला. तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा तर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा विजय झाला. या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलचं चित्र काहीसं बिघडलेलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तर या टीमने प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. दिल्लीचा पराभव केल्यानंतर बंगळूरूच्या खात्यात १४ पॉईंट्स झाले आहेत. तर लखनऊ सुपर जाएंट्सचा पराभव करत मुंबई इंडियन्सने तिसरं स्थान काबिज केलं आहे.

IPL 2025 Playoff Rules
Ipl 2025: अक्षर पटेलच्या 'या' चुका दिल्लीला पडल्या महागात; कर्णधाराच्या निर्णयाने DC वर पराभवाची नामुष्की

गुजरातचं रनरेट आरसीबीपेक्षा उत्तम

दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध जिंकलेल्या सामन्यानंतर बंगळरूचे १० सामन्यांमध्ये ७ विजय आणि ३ पराभवांसह १४ पॉईंट्स आहेत. बंगळूरूचा नेट रनरेट +0.521 आहे. यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये दुसर्‍या स्थानावर गुजरात टायटन्स आहे. गुजरातकडे ८ सामन्यांपैकी ६ विजयांमुळे १२ पॉईंट्स आहेत तर त्यांचं रनरेट +1.104 आहे.

मुंबई इंडियन्सने सलग ५ सामने जिंकले असून ते तिसऱ्या स्थानावर आले आहेत. मुंबईच्या खात्यात ६ विजयांसह १२ पॉईंट्स आहेत. दिल्ली कॅपिटल्स चौथ्या स्थानावर असून त्यांच्या खात्यातही ६ विजयांसह १२ पॉईंट्स आहेत. एकंदरीत स्थिती पाहता याच ४ टीम्स प्लेऑफ गाठणार आहेत.

प्लेऑफची रेस अधिकच मजेदार

आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफची स्पर्धा अधिकत मजेदार झाली आहे. या सिझनमध्ये आतापर्यंत ४६ सामने झाले आहे मात्र कोणतीही टीम अधिकृतरित्या प्लेऑफमधून बाहेर झालेली नाही. सध्याच्या घडीला ३ टीम्सचे १२ पॉईंट्स आहेत. तर पंजाब आणि लखनऊकडे अनुक्रमे ११ आणि १० पॉईंट्स आहेत.

IPL 2025 Playoff Rules
Virat Kohli: हिशोब चुकता! केएल राहुल आणि विराट कोहली मैदानात भिडले, पाहा व्हिडिओ

पंजाब आणि लखनऊ सध्या टॉप ४ मधून बाहेर होऊ शकते. याशिवाय कोलकाता, हैदराबाद, राजस्थान आणि चेन्नईची टीम अजूनही प्लेऑफच्या रेसमध्ये आहेत. मात्र या टीम्ससाठी प्लेऑफचा प्रवास कठीण असणार आहे.

IPL 2025 Playoff Rules
DC VS RCB : पंड्याचा 'विराट' तडका, बेंगळुरूनं दिल्ली जिंकली, पॉईंट टेबलमध्ये नंबर 1

बंगळूरू जर अजून दोन सामन्यांमध्ये विजय मिळवते तर या टीमचं स्थान प्लेऑफमध्ये निश्चित होणार आहे. सध्या बंगळूरूकडे १४ पॉईंट्स आहेत, मात्र तरीही त्यांचं प्लेऑफटं तिकीट पक्क नाहीये. प्लेऑफच्या रेसमध्ये आताही ७ टीम्स अशा ज्यांचे १८ पॉईंट्स होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com