Anand Mahindra Gift To Naushad Khan
Anand Mahindra Gift To Naushad KhanSaam Tv

Anand Mahindra Post: हिम्मत सोडू नका... सरफराजच्या वडिलांना आनंद महिंद्रांकडून खास गिफ्ट

Anand Mahindra Gift To Naushad Khan: प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमीच चर्चेत असतात. आनंद महिंद्रा यांनी क्रिकेटर सरफराज खानचे कौतुक केले आहे. तसेच त्याच्या वडिलांना एक स्पेशल गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे.
Published on

Anand Mahindra Give Gift To Sarfaraz Khan father Naushad khan:

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नागरिकांच्या संपर्कात असतात. त्यांनी सोशल मीडियावर अनेकदा लोकांचे कौतुक केले आहे. आनंद महिंद्रांनी आता क्रिकेटर सरफराजचे कौतुक केले आहे. त्यांनी सरफराजचे वडिल नौशाद खान यांना एक खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे.

आनंद महिंद्रांनी एक्स या अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करत सरफराजचे आणि त्याच्या वडिलांचे कौतुक केले आहे. आनंद महिंद्रांनी सरफराजचे वडिल नौशाद यांना 'थार' गिफ्ट करण्याचा घोषणा केली आहे. (Latest News)

आनंद महिंद्रांनी सरफराज खानचा (Sarfaraz khan) एक व्हिडिओ पोस्ट करत 'हिम्मत सोडू नका, बस्स! कठोर परिश्रम, धैर्य आणि संयम... वडिल यापेक्षा कोणते चांगले गुण मुलाला प्रेरणा देण्यासाठी देऊ शकतात? एक उत्तम आणि प्रेरणा देणारे पालक म्हणून नौशाद खान यांनी थार ही भेटवस्तू स्विकारावी. ही माझा बहुमान आणि सन्मान असेल', असं कॅप्शन लिहले आहे.

Anand Mahindra Gift To Naushad Khan
R Ashwin Record: राजकोटमध्ये इतिहास घडला! आर अश्विनने 500 विकेट्स घेत मोडले हे मोठे रेकॉर्ड्स

सरफराज खानने १५ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावून उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचे सर्व क्षेत्रातून कौतुक केले जात आहे. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी सरफराजला कॅप भेटवस्तू म्हणून दिली. हा व्हिडिओ आनंद महिंद्रांनी पोस्ट केला आहे.

Edited By-Siddhi Hande

Anand Mahindra Gift To Naushad Khan
Yuvraj Singh : माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या आईच्या घरात चोरी; सोन्याचे दागिने आणि रोख पैसे चोरट्यांकडून लंपास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com