BCCI बदलणार भारतीय संघाचे सर्व कोच; NCA ने मागवले अर्ज

बीसीसीआय (BCCI) फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यांच्या करारांना पुढे वाढवण्यात अनुकूल दिसत नाहीय.
BCCI बदलणार भारतीय संघाचे सर्व कोच; NCA ने मागवले अर्ज
BCCI बदलणार भारतीय संघाचे सर्व कोच; NCA ने मागवले अर्जSaam Tv
Published On: 

बीसीसीआय (BCCI) फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यांच्या करारांना पुढे वाढवण्यात अनुकूल दिसत नाहीय. याबाबत BCCI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी 11 नवीन प्रशिक्षकांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यामध्ये रमेश पोवार, एसएस दास, हृषिकेश कानिटकर, सुब्रतो बॅनर्जी आणि सुजित सोमसुंदर हे पाच माजी भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. बीसीसीआयने फलंदाजी, गोलंदाजी (वेगवान आणि फिरकी गोलंदाजी), क्षेत्ररक्षक प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. एनसीएने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.

BCCI बदलणार भारतीय संघाचे सर्व कोच; NCA ने मागवले अर्ज
MS Dhoni चे रौद्र रुप, सरावा दरम्यान मारले उत्तुंग षटकार; पहा Video

इतर सर्व कोचिंग पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर आहे. अलीकडेच क्रिकेट प्रशिक्षकांसाठी लेव्हल 2 कोर्स आयोजित करण्यात आला होता. सहभागींमध्ये भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठान आणि युसूफ पठाण, भारताचे माजी सलामीवीर आणि निवडकर्ते देवांग गांधी, अभिषेक नायर, अशोक डिंडा, अष्टपैलू परवेज रसूल आणि नमन ओझा सहभागी होते. आठ दिवसांच्या ऑनसाइट कोर्सनंतर इरफान पठाणने माध्यमांना सांगितले की, भारतीय क्रिकेटसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे भारताचा माजी कर्णधार द्रविड एनसीएमध्ये मुख्य प्रशिक्षकाची भूमिका सांभाळत होता.

द्रविड हा एकमेव खेळाडू आहे ज्याने एनसीएमध्ये आतापर्यंत क्रिकेट प्रमुख पदासाठी अर्ज केला आहे. नोव्हेंबरमध्ये टी -20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री स्वत: प्रशिक्षण पद सोडणार असल्याचे त्य़ांनी सांगितले आहे. एनसीएमधील सर्व रिक्त पदांसाठी वय मर्यादा ६० वर्ष आहे. कानिटकर आणि शिवसुंदर दास एनसीएमध्ये फलंदाजी कोच आहे. तर बनर्जी गोलंदाजी कोच आहे. सोमसुंदर सध्या क्रिकेटचे शिक्षण प्रमुख आहेत. पोवार भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक आहेत. त्याचबरोबर दास हा संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.