भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जाणारा पहिला कसोटी सामना अत्यंत रंगदार स्थितीत आला आहे. पहिल्या डावात १९० धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने दुसऱ्या डावात ४२० धावांचा डोंगर उभारला. ऑली पोपने १९६ धावांची खेळी करत सामन्याला कलाटणी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र, त्याचे द्विशतक अवघ्या ४ धावांनी हुकले. पोपला इंग्लडच्या तळातील फलंदाजांनीही चांगलीच साथ दिली. टीम इंडियाला (Team India) खराब क्षेत्ररक्षणाचा मोठा फटका बसला. अक्षर पटेल आणि मोहमद सिराजने केलेल्या चूका भारताला चांगल्याच महागात पडल्या.
पोप ११० धावांवर असताना अक्षरने त्याचा सोपा झेल सोडला. या संधीचा पोपने चांगलाच फायदा उचलत भारतीय गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. ही जखम ताजी असताना सिराजने देखील १८६ धावांवर पोपचा झेल सोडला. (Latest Marathi News)
त्यामुळे इंग्लडला दुसऱ्या डावात तब्बल ४२० धावांचा डोंगर उभारता आला. अखेर जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला. त्याने पोपसह तळातील दोन फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. बुमराहला आश्विनने देखील चांगली साथ दिली. दोघांनी मिळून इंग्लडच्या ८ फलंदाजांना बाद केलं.
आता टीम इंडियाला हा कसोटी सामना जिंकण्यासाठी २३१ धावांची गरज आहे. अजूनही सामन्याचे दोन दिवस शिल्लक आहे. मात्र, तरी सुद्धा भारताला २३१ धावा करणे सोपे जाणार नाही. कारण चौथ्या दिवशी मैदानावर चेंडू वेगाने फिरकी घेत आहे. याचा फायदा घेण्याचा इंग्लडच्या फिरकी गोलंदाजांचा प्रयत्न असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.