
नुकतंच IPL 2025 चं ऑक्शन पूर्ण झालं. या ऑक्शनमध्ये कोलकाता नाईड रायडर्सच्या टीमने श्रेयस अय्यरला खरेदी केलं नाही. अशा परिस्थितीत केकेआरचा नवा कर्णधार कोण असणार असा प्रश्न सर्वांसमोर आहे. मात्र एक वृत्तपत्राला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केकेआरचा कर्णधार एक अनुभवी मराठमोळा खेळाडू असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केकेआरच्या कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे दिली जाऊ शकते. त्यामुळे अजिंक्य रहाणेसाठी ही एक सकारात्मक बाब आहे. गेल्या अनेक काळापासून अजिंक्य रहाणे टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र तो देशांतर्गत सामने खेळतोय.
केकेआर संघाशी संबंधित एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं , "होय, या क्षणी हे 90 टक्के निश्चित आहे की, अजिंक्य केकेआरचा नवा कर्णधार असेल. त्याला केकेआरने विशेषत: कर्णधारपदासाठी एक चांगला पर्याय म्हणून विकत घेतलं आहे."
केकेआरच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत अजिंक्य रहाणेशिवाय व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग यांचीही नावं चर्चेत आहेत. व्यंकटेश गेल्या अनेक सिझनपासून टीमचा प्रमुख खेळाडू आहे. टीमचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याशीही त्याचे चांगले संबंध असल्याची माहिती आहे. याशिवाय रिंकू सिंगच्या कारकिर्दीला सुरुवात झाली असून तो टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखला जातो. आता यापैकी कोणाला कर्णधारपदासाठी जबाबदारी मिळते हे पाहावं लागणार आहे.
अजिंक्य रहाणे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबईचा कर्णधार होता. सध्या तो फक्त प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. आयपीएल लिलावापूर्वी रहाणेला चेन्नई सुपर किंग्जने रिलीज केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.