
राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जबाबदारी गौतम गंभीरकडे सोपवण्यात आली होती. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर भारतीय संघासमोरील सर्वात मोठं आव्हान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकण्याचं होतं.
गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आता दुसरं सर्वात मोठं आव्हान म्हणजे, आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आता आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी गंभीरने खास प्लान तयार केला आहे.
भारतीय टी-२० संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे आहे. गेल्या २० सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला, तर भारताने १७ सामने जिंकले आहेत. यादरम्यान २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत आणि धावांचा यशस्वी पाठलाग देखील केला आहे. गंभीरचा प्लान सिंपल आहे, जो खेळाडू फॉर्ममध्ये आहे, त्याला संधी मिळणार. मागचा पुढचा रेकॉर्ड पाहून संघाची निवड केली जाणार नाही.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत संयुक्तरित्या केले जाणार आहे. त्यामुळे आगामी आयपीएल स्पर्धा संघाची निवड करण्यासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. गंभीरच्या मते, अनुभवापेक्षा फॉर्मला महत्व देणं जास्त गरजेचं आहे. गंभीरने हे देखील स्पष्ट केलं आहे, काही टॉप खेळाडू सोडले तर खूप कमी असे खेळाडू आहेत, जे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन्ही फॉरमॅट खेळताना दिसतील. यावरुन हे स्पष्ट आहे की, टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी युवा खेळाडूंना प्राधान्य दिले जाऊ शकते.
भारतीय टी-२० संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. रोहितने ही जबाबदारी सोडल्यानंतर ही जबाबदारी सूर्याला मिळाली होती. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने कित्येक वेळेस २५० धावांहून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.