
अहमदाबादमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टेस्ट सामना सुरू झाला आहे. या सामन्याचा टॉस पार पडला असून दोन्ही संघांनी आपापली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकला असून टीम इंडिया पहिल्यांना गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या टेस्ट सिरीजमधून भारताने आपल्या घरच्या सिझनची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, हा सामना यंदाच्या वर्षातील भारतीय टीमचा घरी खेळला जाणारा पहिला टेस्ट सामना आहे.
टीम इंडियाने या सामन्यासाठी दमदार खेळाडू मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. टीममध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच तरुण खेळाडूंनाही संधी देण्यात आलीये.
भारतीय टीममधील फिरकीपटू कुलदीप यादव तब्बल 11 महिन्यांनंतर टेस्ट टीममध्ये परतला आहे. त्याने शेवटचा टेस्ट सामना मागील वर्षी 16 ते 20 ऑक्टोबरदरम्यान बेंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तब्बल 347 दिवसांनी त्याची टेस्ट टीममध्ये पुनरागमन झालं आहे. या सामन्यात तो भारतीय प्लेइंग इलेव्हनचा महत्त्वाचा भाग ठरला आहे.
भारतीय संघात कुलदीप यादवशिवाय आणखी दोन स्पिनर म्हणजे उपकर्णधार रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोन अनुभवी वेगवान गोलंदाजांची जोडी मैदानात उतरली आहे. त्यांना पेस ऑलराउंडर नीतीश रेड्डीचा देखील सपोर्ट आहे. ओपनिंगची जबाबदारी इंग्लंड दौऱ्याप्रमाणेच यावेळीही यशस्वी जायसवाल आणि के. एल. राहुल यांच्या खांद्यावर आहे.
वेस्ट इंडिजच्या टीमने या सामन्यासाठी तीन पेसर आणि दोन विशेष स्पिनर उतरवले आहेत. टीमचं नेतृत्व अनुभवी खेळाडू रोस्टन चेज करत आहेत. त्यांचा उद्देश भारतीय फलंदाजांवर दबाव आणण्याचा असणार आहे.
यशस्वी जायसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरैल, नीतीश रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
तेजनारायण चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, एलिक अथानाजे, ब्रेंडन किंग, शे होप, रोस्टन चेज (कर्णधार), जस्टिन ग्रीव्ह्स, जोमेल वॉरिकन, खैरी पियरे, जोहान लेन, जायडन सील्स.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.