Mohammad Nabi : बांगलादेशला एकहाती नमवलं, आता स्टार ऑलराऊंडर रिटायर होणार?

Mohammad Nabi Champions Trophy 2025: बांगलादेशविरुद्धच्या मालिकाविजयानंतर मैदानातच अफगाणिस्तानचा स्टार ऑलराऊंडर मोहम्मद नबीनं निवृत्तीचे संकेत दिले.
Mohammad Nabi
Mohammad Nabisaam tv
Published On

अफगाणिस्तानने काल झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये ५ गडी राखत बांग्लादेशचा पराभव केला. सोबतच त्यांनी २-१ अशी आघाडी मिळवत मालिकाही खिशात घातली. या मालिकामध्ये अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद नबी 'प्लेयर ऑफ द सीरिज' ठरला. त्याने ३ सामन्यांमध्ये १३५ धावा केल्या. पहिल्या सामन्यात त्याने विक्रमी ८४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. शिवाय त्याने दोन महत्त्वपूर्ण गडी देखील बाद केले. मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानंतर मोहम्मद नबीने त्याच्या निवृत्तीबाबत एक मोठी घोषणा केली. (Cricket News)

मालिका विजयानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये मोहम्मद नबी म्हणाला, "मागील विश्वचषकापासून निवृत्तीचे विचार माझ्या मनात होते. एकप्रकारे मी निवृत्त झालोय असं मला सतत वाटत होतं. पण आता आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पात्र ठरलो आहोत. निवृत्तीपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळायची संधी मिळाली तर खूप छान होईल."

नबीची कारकीर्द

अफगाणिस्तान संघासाठी मोहम्मद नबी हा अनुभवी खेळाडू महत्वाचा आहे. त्याने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या एकूण कारकीर्दीमध्ये त्याने २७.४८ च्या सरासरीने १४७ डावांमध्ये ३,६०० धावा केल्या आहेत. त्यामध्ये २ शतक आणि १५ अर्धशतक ठोकले आहेत. फलंदाजीसह नबीने गोलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली आहे. एकूण १६१ डावांमध्ये त्याने १७२ गडी बाद केले आहेत.

पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार

गतवर्षीच्या विश्वचषकामध्ये अफगाणिस्तान सहाव्या क्रमांकावर होता. चांगल्या कामगिरीमुळे या संघाला पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पात्र असलेल्या संघांमध्ये समावेश होण्याची अफगाणिस्तानची ही पहिलीच वेळ आहे.

Mohammad Nabi
IND vs AUS: विराट की रोहित; ऑस्ट्रेलियात कोणाची बॅट तळपते? वाचा BGT मध्ये कसा राहिलाय दोघांचा रेकॉर्ड

अफगाणिस्तानची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरू असलेली घोडदौड पाहता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा त्यांच्यासाठी खास ठरणार आहे, असे म्हटले जात आहे.

Mohammad Nabi
IND vs SA 3rd T20I: पराभवानंतर टीम इंडियाची Playing XI बदलणार; या 2 बदलांसह उतरणार मैदानात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com