
नेहमीप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्सची आयपीएलची सुरुवात मनासारखी झाली नाही. मुंबईचे आतापर्यंत ३ सामने झाले असून केवळ एकाच सामन्यात टीमला विजय मिळवता आला आहे. आयपीएल २०२४ मध्ये मुंबईने रोहित शर्माला बाजूला सारत हार्दिक पंड्याकडे टीमची कमान सोपवली. त्यानंतर टीमचा ग्राफ काही प्रमाणात उतरत असल्याचं दिसून येतंय. अशातच टीमचा माजी कर्णधार रोहित शर्माने टीममध्ये असलेल्या त्याच्या भूमिकेबाबत खुलासा केला आहे.
जिओ हॉटस्टारवर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, मी सुरुवात केल्यापासून काही गोष्टी स्पष्टपणे बदलल्या आहेत. मी पूर्वी मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करायचो, पण आता मी डावाची सुरुवात करतो. मी कर्णधार होतो, आता नाहीये. आमच्या चॅम्पियनशिप विजेत्या सिझनमधील माझे काही सहकारी आता प्रशिक्षकपदी आहेत. तर, भूमिका बदलल्या आहेत, बरेच काही बदललं आहे, मात्र मानसिकता तीच आहे
रोहित पुढे म्हणाला, 'या टीमसाठी मला जे करायचंय आहे ते बदललेलं नाही. ती गोष्ट म्हणजे सामने आणि ट्रॉफी जिंकणं. मुळात मुंबई इंडियन्स यासाठीच ओळखली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि अशा परिस्थितीतून खेळ बदलला आहे.
टीमची खासियत सांगताना रोहित म्हणाला, 'ट्रेंट बोल्टसारखे खेळाडू, जे आधी या टीममध्ये होते, ते भरपूर अनुभव घेऊन येतात आणि एमआयची संस्कृती समजून घेतात. मग आपल्याकडे न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर आहे, ज्याच्याकडे अनुभव आणि दर्जा या दोन्ही गोष्टी आहेत. विल जॅक्स आणि रीस टॉपली सारखे खेळाडू विविधता आणतात, तर रायन रिकेलटन हा एक उत्तम तरुण खेळाडू आहे.
यातील प्रत्येक खेळाडू टीममध्ये काहीतरी वेगळेपण आणतो आणि जेव्हा तुम्ही त्यांना एकत्रितपणे एकत्र आणता तेव्हा त्याचा मोठा परिणाम होताना दिसतो. आमच्याकडे अनेक तरुण भारतीय खेळाडू आहेत ज्यांच्याकडे खूप क्षमता आहे आणि मी त्यांच्यासोबत खेळण्यास उत्सुक आहे. सध्या आमचं लक्ष्य टाटा आयपीएल ट्रॉफी जिंकून मुंबई इंडियन्सला पुन्हा तो गौरव मिळवून द्यायचा आहे, असं रोहितने सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.