Surya Grahan: सूर्यग्रहणाचा 'या' ५ राशींवर होणार परिणाम; करिअर,आयुष्यात वाढू शकतो तणाव

Surya Grahan: २०२४ मधील पहिले सूर्यग्रहण लवकरच होणार आहे. हे सूर्यग्रहण अनेक देशांना दिसणार आहे. सूर्यग्रहणाचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे.
Surya Grahan
Surya GrahanSaam Tv
Published On

Surya Grahan 2024 Effect:

हिंदू कॅलेंडरनुसार २०२४ मध्ये पहिले सूर्यग्रहण लवकरच होणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला खूप महत्त्व आहे. ज्योतिषांच्या मते या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात होणार आहे. सूर्यग्रहण अनेक देशांमध्ये दिसणार आहे, मात्र भारतात ते दिसणार नाही.(Latest News)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह आपली राशी किंवा नक्षत्र बदलतात तेव्हा ग्रहण होते, मग ते सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण. दरम्यान या सर्वांचा पृथ्वीवरील सर्व सजीवांवर काही ना काही प्रभाव पडतो. सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पडत असतो. सूर्यग्रहण ५ राशीच्या लोकांवर परिणाम करेल. या ५ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही अडचणी वाढू शकतात. त्या 5 राशींबद्दल जाणून घेऊया.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण चांगले राहणार नाही. ग्रहणामुळे व्यक्तीला काही कामात अडचणी येऊ शकतात. आर्थिक अडचणी देखील असू शकतात. विवाहितांच्या जीवनात अशांतता येऊ शकते. शेजाऱ्यांशी भांडण होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे ग्रहणकाळात काळजी घ्या.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिले सूर्यग्रहण अशुभ मानले जाते. या काळात व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. व्यवसायात नुकसानही होऊ शकते. त्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते आणि त्याहूनही अधिक म्हणजे जीवनात एखाद्या गोष्टीची कमतरता जाणवू शकते.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिले सूर्यग्रहण शुभ मानले जात नाही. ग्रहणापूर्वी वैयक्तिक जीवनात अडचणी वाढू शकतात. व्यवसायातही अडचणी येऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित मानसिक तणाव असू शकतो. आरोग्यातही चढ-उतार होतील.

वृश्चिक

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार वर्षातील पहिले सूर्यग्रहण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ नसणार आहे. ग्रहणाच्या काळात वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढू शकतात. तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात दबाव वाढू शकतो. तसेच मानसिक तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठीही वर्षातील पहिले सूर्यग्रहण फायदेशीर नसणार आहे. पहिले सूर्यग्रहण या राशीसाठी शुभ नसते, असं मानले जाते. नोकरी करणाऱ्यांसाठी ग्रहण अधिक अशुभ राहील. नोकरीत अडचण येऊ शकते. वरिष्ठांकडून कामाचा दबाव निर्माण होऊ शकतो. पदोन्नतीतही खंड पडू शकतो.

टीप : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही याला दुजोरा देत नाही. तसेच या गोष्टींशी सहमत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com