Mauni Amavasya 2024 : मौनी अमावास्येनंतर ४ राशींचे भाग्य उजळणार! प्रेमाची आस पूर्ण होणार, नोकरीत उत्तम संधी

Mauni Amavasya 2024 Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार पौष अमावास्येला मौनी अमावास्या म्हणून ओळखले जाते. याला दर्श अमावास्या असेही म्हणतात. ही अमावास्या अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी स्नान करुन दान केल्याने देखील अधिक फायदा होतो.
Mauni Amavasya 2024
Mauni Amavasya 2024 Saam Tv
Published On

Mauni Amavasya 2024 Budh Uday :

ज्योतिषशास्त्रानुसार पौष अमावास्येला मौनी अमावास्या म्हणून ओळखले जाते. याला दर्श अमावास्या असेही म्हणतात. ही अमावास्या अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी स्नान करुन दान केल्याने देखील अधिक फायदा होतो.

यंदा ही अमावास्या ९ फेब्रुवारीला आहे. यादिवशी स्नान,दान आणि धार्मिक कार्यांना अधिक महत्त्व आहे. असे केल्याने पुण्य फळ मिळते आणि पितरांचा आशिर्वादही मिळतो. तसेच ८ फेब्रुवारीला बुध ग्रहांचा राजकुमार मकर राशीत अस्त पावणार आहे.

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची अस्त आणि उदय स्थिती ही महत्त्वाची मानली जाते. मौनी अमावस्येचा मेष ते मीन १२ राशींच्या (Rashi) जीवनावर परिणाम कसा होईल. बुधाच्या हालचालीतील बदलाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होईल. जाणून घेऊया मौनी अमावास्येनंतर कोणत्या राशी लकी ठरणार आहे.

1. मेष

ग्रहांच्या संक्रमणामुळे मेष राशीचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहाणार आहे. जमीन आणि वाहनाचे सुख मिळेल. उत्पन्नाच्या (Money) नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ होतील. मित्रांच्या (Friends) मदतीने करिअरमधील समस्या दूर होतील.

Mauni Amavasya 2024
Valentine Day 2024 : 'व्हॅलेंटाईन डे'ला अद्भुत संयोग! या शुभ मुहूर्तावर करा प्रपोज, प्रेमात मिळेल होकार

2. वृषभ

व्यवसायात लाभ होईल. करिअरमध्ये मोठे यश मिळेल. नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे. पैशांची आवक वाढेल. आरोग्य सुधारेल. कर्जापासून सुटका होईल.

3. कर्क

बुधाच्या अस्तामुळे उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतून पैसा मिळेल. करिअरमध्ये मोठे यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहिल.

Mauni Amavasya 2024
Mahabaleshwar Travel Place : महाबळेश्वरला फिरायला जाताय? मॅप्रो गार्डनच नाही तर या पर्यटनस्थळांनाही द्या भेट

4. कन्या

ग्रहांच्या संक्रमणामुळे जीवनात अनेक मोठे बदल होते. प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होईल. भौतिक सुखसोयी आणि संपत्तीत वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल. आनंदी जीवन जगेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com