Solar Eclipse 2022 : सूर्यग्रहणाचा 'या' 4 राशींवर पडेल विशेष प्रभाव, चमकेल नशीबही

काही राशींना या सूर्यग्रहणाचा त्रास सहन करावा लागेल आणि त्यांची अनेक कामे बिघडतील.
Solar Eclipse 2022
Solar Eclipse 2022Saam Tv

Solar Eclipse 2022 : आज खंडग्रास सूर्यग्रहण असून ते वर्षातील शेवटचे सूर्य ग्रहण आहे. या ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळा असेल. काही राशींना या सूर्यग्रहणाचा त्रास सहन करावा लागेल आणि त्यांची अनेक कामे बिघडतील. त्याच वेळी, अशा 4 राशी आहेत, ज्यांच्यासाठी हे सूर्यग्रहण आनंद घेऊन येत आहे. चला तुम्हाला सांगतो या भाग्यशाली राशी कोणत्या आणि त्यांना ग्रहणामुळे कोणते फायदे मिळणार आहेत. (Latest Marathi News)

Solar Eclipse 2022
Solar Eclipse : दिवाळीत आहे वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण, गर्भवती महिलांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

1. मिथुन

Gemini
GeminiCanva

कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो. जुने प्रकरण तुमच्या बाजूने निकाली निघू शकते. तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता.

2. सिंह

Leo
LeoCanva

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या सूर्यग्रहणातून आर्थिक लाभाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील आणि रखडलेली कामे वेगाने पुढे सरकतील. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. ऑफिसमध्ये (Office) अनेक नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. बिझनेस ट्रिपला (Trip) जाण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात काही गडबड होऊ शकते. (Surya Grahan October 2022) 

Solar Eclipse 2022
Diwali 2022 : दिवाळीत भाजलेल्या जखमांचा सामना करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, काय करावं आणि काय करू नये हे जाणून घ्या

3. वृश्चिक

Scorpio
ScorpioCanva

या राशीचे लोक त्यांच्या सोयीसाठी अनेक चैनीच्या वस्तू खरेदी करू शकतात. व्यवसायात काही अडचणी येतील, पण सहकाऱ्यांच्या मदतीने त्यावर मात कराल. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी गोष्टी अनुकूल असतील. तुम्ही काही नवीन क्षेत्रातही गुंतवणूक करू शकता. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी गोष्टी नीट समजून घ्या.

4. मीन

Pisces
PiscesCanva

आर्थिक बाबतीत सावध राहा. मालमत्ता किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात लाभाची स्थिती असेल आणि तुम्हाला अनेक मोठे सौदे मिळू शकतात. नोकरीत बढती किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाण्याची किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com