रात्रीच्या वेळी मृतदेह एकटा का सोडत नाहीत? जाणून घ्या यामागील धार्मिक कारण

Garuda Purana Explained: हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करणे निषिद्ध मानले जाते. गरुड पुराणांनुसार, रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार केल्यास स्वर्गाची द्वारे बंद होतात. मृतदेह रात्रीच्या वेळी एकटा का ठेवू नये आणि या प्रथेमागील धार्मिक कारणे काय आहेत, ते जाणून घ्या.
Garuda Purana: Why Is A Dead Body Not Left Alone At Night?
Garuda Purana: Why Is A Dead Body Not Left Alone At Night?saam tv
Published On: 
Summary
  • काही हिंदू कुटुंबांमध्ये रात्रीच्या वेळी मृतदेह एकटा न ठेवण्याची प्रथा

  • मृत्यू, आत्मा आणि अंत्यसंस्कारांशी संबंधित धार्मिक मान्यतांसाठी गरुड पुराणाचा उल्लेख

  • रात्री अंत्यसंस्कार केल्यास स्वर्गाची द्वारे बंद होतात,अशी मान्यता आहे.

हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. रात्रीच्या वेळी म्हणजेच सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार केल्यास स्वर्गाची द्वारे बंद होतात आणि नरकाची द्वारे उघडतात. परिणामी आत्म्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागतात. इतकेच नाही तर एखाद्या व्यक्तीचं मृत्यू रात्रीच्यावेळी झाला असेल तर मृत व्यक्तीचे पार्थिव रात्रीच्या वेळी कधीच एकटे सोडले जात नाही. ही प्रथा 'गरुड पुराणा'त वर्णन केलेल्या समजुतींवर आधारित आहे. चला, यामागची कारणे जाणून घेऊ.

रात्रीच्या वेळी मृतदेह एकटा किंवा विना देखरेख का ठेवू नये?

गरुड पुराणात नमूद केलेल्या समजुतींनुसार, जर रात्रीच्या वेळी मृतदेहशेजारी कोणी नसलं तर आसपास फिरणाऱ्या नकारात्मक शक्ती त्यामध्ये प्रवेश करू शकतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ शकतो, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागू शकतो. याशिवाय धार्मिक समजुतींनुसार, रात्रीच्या वेळी तांत्रिक विधींचा प्रभाव अधिक तीव्र होत असतो. त्यामुळे मृतदेह सोडून दिल्यास त्याचा वापर अशा तांत्रिक कार्यांसाठी केला जाण्याची भीती असते, ज्यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला हानी पोहोचू शकते.

Garuda Purana: Why Is A Dead Body Not Left Alone At Night?
Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

मृतदेहाचे प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी

मृतदेहाला रात्रीच्या वेळी एकटे न सोडण्यामागे एक व्यावहारिक कारणही आहे. जर मृतदेह मोकळ्या जागेत एकटाच सोडला, तर कुत्रे, मांजरी किंवा इतर प्राणी त्याचे नुकसान करू शकतात. शिवाय, मृत्यूनंतर काही काळानंतर शरीरात नैसर्गिक बदल होऊ लागतात, ज्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊ शकते.

या कारणास्तव, मृतदेहाच्या शेजारी नेहमी कोणीतरी बसलेले असते आणि जवळच अगरबत्त्या लावल्या जातात. याचा उद्देश परिसर सुगंधी ठेवणे आणि कोणताही अप्रिय वास कमी करणे हा देखील असतो.

Garuda Purana: Why Is A Dead Body Not Left Alone At Night?
'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात खडूस; भांडणात सासूबाईंची करतात बोलती बंद

मृत्यूनंतर आत्म्याचे शरीराच्या आसपास भटकण्याबाबतची धारणा

गरुड पुराणाशी संबंधित समजुतींनुसार, मृत्यूनंतर आत्मा काही काळापर्यंत आपल्या पूर्वीच्या शरीराच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आसपास भटकत राहतो. तो आपल्या प्रियजनांचे निरीक्षण करत असतो आणि त्याला आपल्या पूर्वीच्या शरीराविषयीची ओढ वाटत राहत असतो. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, मृत्यूनंतर शरीर आत्म्यापासून विलग होते. आत्म्याशिवाय असलेल्या या मृतदेहावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडू शकतो. याच कारणामुळे, रात्रीच्या वेळी मृतदेह कधीही एकटा सोडला जात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com