Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

Signs And Symptoms Of Evil Eye: कुंडलीत चंद्र किंवा राहू ग्रह कमकुवत असेल तर वाईट नजर पटकन लागते. अचानक संकटं येणे, मानसिक अस्वस्थता, यशात अडथळे, झोपेचा अभाव हे दुष्ट्र लागण्याचे संकेत असतात.
Signs And Symptoms Of Evil Eye
When Moon or Rahu is weak in kundli, chances of evil eye effects increase saam tv
Published On
Summary
  • कुंडलीत चंद्र किंवा राहू ग्रह कमकुवत असल्यास व्यक्ती वाईट नजरेला लवकर बळी पडतो

  • अचानक होणारी संकटं, मानसिक अस्वस्थता, झोपेचा त्रास ही वाईट नजरेची संकेतं असू शकतात

  • ज्योतिषशास्त्रानुसार अशा लक्षणांवरून वाईट नजर ओळखता येते

  • हळद, काळे उडीद, किंवा नारळ वापरून पारंपरिक उपाय करून नजर काढता येते

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र कमकुवत असतो त्याला वाईट नजरेचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. नजर लागल्याचं हे कसे कळते असा प्रश्न अनेकजण विचारतात. ज्योतिषशास्त्रात, अशी काही संकेत सांगण्यात आली आहेत जे नजर लागल्याचं सुचित करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र किंवा राहू कमकुवत असेल तर त्याला वाईट नजरेचा खूप लवकर त्रास होत असतो. कधीकधी लोकांच्या आयुष्यात अचानक समस्या वाढतात किंवा विचित्र घटना घडू लागतात.

जे नजर लागण्याचे लक्षण असू शकतात. बऱ्याचदा लोकांना जाणून घ्यायचे असते की, त्यांच्यावर वाईट नजर आहे की नाही, ते कसे शोधायचे. ज्योतिषशास्त्र अशा काही संकेत सांगण्यात आली आहेत, जे एखाद्यावर वाईट नजर असल्याचं सांगत असतात. चला जाणून घेऊया वाईट नजरेची लक्षणे कोणती आहेत.

नजर लागणे म्हणजे काय?

नजर दोषाला सामान्यतः वाईट नजर किंवा दुष्ट्र लागणे असे म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार, एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर जेव्हा एखाद्याची नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजर पडते तेव्हा त्यावर नकारात्मक परिणाम होतो. दुष्ट्र लागण्याने शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक समस्या निर्माण करू शकतो.

Signs And Symptoms Of Evil Eye
Budha Grah: या ४ राशींचे उजळणार भाग्य; बुध ग्रह कर्क राशीत असताना होणार चमत्कार

ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुमच्या हाताचे आणि पायाचे नखे अचानक खराब होऊ लागले किंवा तुटू लागले तर समजून घ्या की तुम्हाला दुष्ट्र लागलीय. हे एखाद्याच्या नकारात्मक उर्जेचा वाईट परिणाम असू शकतो.

धार्मिक श्रद्धेनुसार, जर कावळा तुमच्या घरा जवळ येऊन हाड फेकत असेल तर ते खूप वाईट लक्षण आहे. याचा अर्थ असा की, तुमच्यावर वाईट नजर पडली आहे. जर असे घडले तर तुम्ही दुष्ट्र उतरवण्यासाठी उपाय केले पाहिजे.

Signs And Symptoms Of Evil Eye
Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागण्याचा त्रास होतो तेव्हा त्यांना रात्री झोप लागत नाही. तो तणावात राहतो आणि कोणत्याही कारणाशिवाय डोकेदुखीचा त्रास होत असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागते त्रास होतो तेव्हा तो दररोज कोणत्या ना कोणत्या समस्येने वेढलेला असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री वाईट स्वप्ने पडणे हे देखील सूचित करते की एखाद्याच्या नकारात्मक उर्जेने तुम्हाला वेढले आहे. तुम्हाला दुष्ट्र लागल्याचं समजावं.

टीप: या बातमीत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. साम टीव्ही याला पृष्टी करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com