Vanvibhag Bharti: वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी सुरु आहे भरती; पात्रता जाणून घ्या

Vanvibhag Bharti 2024: महाराष्ट्रात वनविभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. कोल्हापूर येथील वनविभाग कार्यालयात ही भरती केली जाणार आहे.
Vanvibhag Bharti
Vanvibhag BhartiSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. मुख्य वनसंरक्षण विभागात ही भरती केली जाणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासन वन विभागाद्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील वनविभागात विधी सल्लागार या पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे.

Vanvibhag Bharti
Kokan Railway Job: कोकण रेल्वेत नोकरीची संधी; महिना ६८००० रुपये पगार; पात्रता जाणून घ्या

विधी सल्लागार पदासाठी उमेदवारांना विधी विषयक कामाचा अनुभव असायला हवा. सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी येथे कामाचा अनुभव असावा. सेवानिवृत्ती अधिकारी आणि न्यायाधीशांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत.

कोल्हापूर येथे ही पदभरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतो. १८ ऑक्टोबरपर्यंत तुम्ही अर्ज पाठवू शकतात.सुट्टीच्या दिवशी अर्ज पाठवू नये. मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कार्यालय, वनवर्धन इमारत, तळमजला, पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर, ४१६००३ येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.याबाबत सर्व माहिती जाहिरातीत देण्यात आली आहे. (Van Vibagh Job)

Vanvibhag Bharti
DRDO Job: DRDO मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी; 'या' पदांसाठी निघाली भरती; पात्रता अन् अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

नाबार्डमध्ये नोकरी

१०वी पास तरुणांसाठी नाबार्डमध्येही नोकरीची संधी आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत १०८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ऑफिस अटेंडंट ग्रूप सी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १०वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Vanvibhag Bharti
Railway Jobs: तब्बल १४२९८ जागांसाठी रेल्वेत मेगाभरती; दहावी पास उमेदवारही करु शकतील अर्ज; जाणून घ्या सर्वकाही

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com