Fact Check : 'डेअरी कर्ज योजने'बाबतची 'ती' माहीती चुकीची; नाबार्डने केलं स्पष्ट

nabard Latest news : दुग्धउद्योजकता विकास योजनेंतर्गत नाबार्ड दुग्धव्यवसाय व्यवसायांसाठी शेतकऱ्यांना थेट कर्ज देत असल्याचे खंडन केलं आहे. या योजनेविषयी माहिती पूर्णतः चुकीची असल्याचे नाबार्डने स्पष्ट केले आहे.
Fact Check : 'डेअरी कर्ज योजने'बाबतची 'ती' माहीती चुकीची; नाबार्डने केलं स्पष्ट
Fact Check :nabard Latest news

मुंबई : नॅशल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने नाबार्ड डेअरी कर्ज योजनेबद्दल चुकीची माहिती पसरत आहे. या योजनेविषयी खरी माहिती नागरिकांना समजण्यासाठी नाबार्डने खुलासा केला आहे. दुग्धउद्योजकता विकास योजनेंतर्गत नाबार्ड दुग्धव्यवसाय व्यवसायांसाठी शेतकऱ्यांना थेट कर्ज देत असल्याचे खंडन केलं आहे. या योजनेविषयी माहिती पूर्णतः चुकीची असल्याचे नाबार्डने स्पष्ट केले आहे.

नाबार्ड विविध वित्तीय संस्था आणि सहकारी संस्थांना आर्थिक सहाय्य करण्याचे कार्य करते. मात्र, वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. यामुळे भागधारक, शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांनी अशा चुकीच्या माहितीबाबत सावध व्हावे. याविषयीच्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये.

तसेच नाबार्ड डेअरी कर्ज योजनेबद्दल चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, त्याचबरोबर प्रचार करण्यापासून दूर राहावे, असं आवाहन नाबार्डने केलं आहे. चुकीच्या माहितीमुळे कोणालाही आर्थिक जोखीम, नुकसान आणि गैरसमज होऊ शकतात. नाबार्डच्या विविध योजनांची माहिती www.nabard.org या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Fact Check : 'डेअरी कर्ज योजने'बाबतची 'ती' माहीती चुकीची; नाबार्डने केलं स्पष्ट
Fact Check: लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्यास बँकेतून 350 रुपये कापले जातील? जाणून घ्या व्हायरल पोस्टमागील सत्य

नाबार्डकडून विविध उपक्रम आणि योजनांद्वारे ग्रामीण विकास आणि शेतीला चालना देण्याचा प्रयत्न केला जातो. भागधारक , शेतकऱ्यांनी चुकीच्या माहितीला बळी पडून आर्थिक नुकसान करू नये. नाबार्डच्या नावाखाली पसरणाऱ्या डेअरी कर्ज योजनांच्या चुकीच्या माहितीच्या प्रसाराला परावृत्त करण्यासाठी सर्व भागधारकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नाबार्डने केलं आहे.

Fact Check : 'डेअरी कर्ज योजने'बाबतची 'ती' माहीती चुकीची; नाबार्डने केलं स्पष्ट
IPL 2024,Fact Check: पाथिराना खरंच धोनीच्या पाया पडला का? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

तत्पूर्वी, विविध योजनांविजवळच्या कार्यालयाला भेट देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना तसेच संबंधित घटकांना केले जात आहे. याषयी स्पष्टीकरण किंवा चौकशी, नाबार्डशी थेट संपर्क साधण्याचं आव्हान संस्थेकडून करण्यात आलं आहे. तसेच अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com