Fact Check: लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्यास बँकेतून 350 रुपये कापले जातील? जाणून घ्या व्हायरल पोस्टमागील सत्य

Lok Sabha Election: एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जे मतदार लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाहीत, त्यांच्या बँक खात्यातून निवडणूक आयोगाकडून 350 रुपये कापले जातील.
Lok Sabha Election 2024 Viral Post
Lok Sabha Election 2024 Viral PostSaam Tv

Lok Sabha Election 2024 Viral Post:

लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. या महिन्यात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याबाबतची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. राजकीय पक्ष आपापल्या परीने विजय मिळविण्यासाठी प्रचार करत आहेत. जनतेने आपल्या बाजूने कौल द्यावा म्हणून राजकीय पक्ष आश्वासनाचा पाऊस करत आहेत.

याचदरम्यान लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जे मतदार लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाहीत, त्यांच्या बँक खात्यातून निवडणूक आयोगाकडून 350 रुपये कापले जातील.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lok Sabha Election 2024 Viral Post
Arvind Kejriwal: केजरीवाल यांचा आयफोन अनलॉक करण्यासाठी ईडीने मागितली ॲपलची मदत, जाणून घ्या कंपनी काय म्हणाली?

बँक खात्यातून 350 रुपये कापले जाणार?

या पोस्टनुसार, जर कोणत्याही मतदाराने त्याच्या मताधिकाराचा वापर केला नाही तर त्याच्या खात्यातून 350 रुपये कापले जातील. सर्व मतदारांना सक्तीने मतदान करावे लागेल, असे त्यात म्हटले आहे. अन्यथा त्यांच्या खात्यातून 350 रुपये कापले जातील.  (Latest Marathi News)

हा दावा पूर्णपणे खोटा आहे

मात्र जेव्हा या दाव्याची सत्यता पडताळून पाहिली असता त्यातील सत्य काही वेगळेच असल्याचे समोर आले. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबीने आपल्या तपासणीत म्हटले आहे. पीआयबीने म्हटले आहे की, भारताच्या निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशा बातम्या शेअर करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

Lok Sabha Election 2024 Viral Post
Income Tax Notice To Congress : लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसवरील कारवाई टळली; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

दरम्यान, राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. यात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्याचे 7 मे, चौथ्या टप्प्याचे 14 मे आणि पाचव्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी होणार आहे. तसेच निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com