UPSC CAPF Recruitment
UPSC CAPF RecruitmentSaam Tv

UPSC: बीएसएफ, सीआरपीएफ अन् ITBP मध्ये नोकरीची संधी; ३५७ रिक्त जागा, अर्ज कसा करावा?

UPSC CAPF Recruitment: केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. असिस्टंट कमांडंट पदासाठी ही भरती आहे. यामध्ये ३५७ जागा भरती केल्या जाणार आहेत.
Published on

केंद्रीय लोक सेवा आयोग(UPSC)ने भरती जाहीर केली आहे. केंद्रिय सशस्त्र पोलिस दलात असिस्टंट कमांडंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेत अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर upsconline.gov.in जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. त्यामुळे पुढच्या १५ दिवसांत तुम्हाला अर्ज करायचा आहे.

UPSC CAPF Recruitment
Job Openings Meta : तरुणांसाठी खुशखबर! जगातील नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी; शैक्षणिक पात्रता अन् पद कोणकोणती?

या भरती मोहिमेत ३५७ पदे रिक्त आहेत. त्यातील बीएसएफमध्ये २४ रिक्त पदे आहेत. आयटीबीपीमध्ये ४ पदे, एसएसबीमध्ये ३३ पदे अशी वेगवेगळ्या विभागात पदभरती करण्यात येणार आहे.

असिस्टंट कमांडंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. तसेच २० ते २५ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना श्रेणीनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. त्यानंतर शारीरिक टेस्ट होणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

UPSC CAPF Recruitment
BOI Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; १५९ रिक्त पदे; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

स्टेट बँकेत इंटर्नशिप (SBI Internship)

सध्या स्टेट बँकेतही इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी आहे. एसबीआय यूथ फॉर इंडिया फेलोशिप प्रोग्रामअंतर्गत भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. ज्या तरुणांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना चांगल्या बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी आहे.

UPSC CAPF Recruitment
Metro Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मेट्रोत भरती सुरु, पगार २.८० लाख, पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com