ONGC Recruitment: ONGC मध्ये नोकरीची संधी; मिळणार १८०००० रुपये पगार; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

ONGC Recruitment 2025: ओएनजीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.
ONGC Recruitment
ONGC RecruitmentSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. चांगल्या पगाराची नोकरीच्या शोधात असाऱ्या तरुणांसाठी या नोकरीसाठी अर्ज करावेत. ओएनजीसीमध्ये एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. ongcindia.com या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करावा. (ONGC Recruitment 2025)

ONGC Recruitment
Government Job: महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; पात्रता पदवीधर; अशा पद्धतीने करा अर्ज

ओएनजीसीमध्ये १०८ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ओएनजीसीमध्ये जियोलॉजिस्ट पदासाठी ५ जागा रिक्त आहेत.जिओफिजिस्टिक्ससाठी ३ जागा रिक्त आहे. मॅकेनिकल पदासाठी ११ जागा रिक्त आहे. प्रोडक्शनमध्ये १९ जागा रिक्त आहे. एकूण १०८ विविध पदांवर ही भरती केली जाणार आहे. (ONGC Jobs)

ONGC Recruitment
Government Job: १०वी पास ते पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; निती आयोगात भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवाराची वयोमर्यादा २६ वर्षे असावी. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा २९ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा ३१ वर्षे असावी.

ओएनजीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ६०,००० ते १,८०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

ONGC Recruitment
Anganwadi Jobs: अंगणवाडीत बंपर भरती! ५ वी ते १२ वी पास महिला करु शकतात अर्ज; वाचा संपूर्ण प्रोसेस

ओएनजीसीमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू आणि त्यानंतर मेरिट लिस्टआधारे केली जाणार आहे. सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

ONGC Recruitment
Government Job: परीक्षेशिवाय सरकारी नोकरी, पगार १५०००० रुपये; AAI मध्ये मेगा भरती,अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com