.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. सायकोलॉजिस्ट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. याबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. (Punjab National Bank Recruitment)
पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. तुम्ही pnbindia.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याची संधी तुमच्याकडे आहे.(PNB Recruitment)
पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ७० वर्ष असावी. सायकोलॉजिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायकोलॉजिस्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन (M.A)पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १० वर्षांचा अनुभव असायला हवा. (Government Job)
सायकोलॉजिस्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला १,००,००० रुपये पगार मिळतो. या नोकरीसाठी उमेदवारांना अतिरिक्त भत्ते आणि सुविधा दिले जातात.
पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही परिक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी
सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. ६९० रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. नगर अभियंता खात्यात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.