PMC Recruitment: इंजिनियर झालात ? पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; १०० पदांसाठी भरती; लवकरच सुरु होणार अर्जप्रक्रिया

PMC Recruitment 2025: इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेत १०० कनिष्ठ इंजिनियर पदासाठी भरती सुरु आहे.
PMC Recruitment 2025
PMC Recruitment 2025Saam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पुणे महानगरपालिकेतील रखडलेली भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. पुणे महानगरपालिकेत १०० कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. (PMC Recruitment)

PMC Recruitment 2025
Bank Job: सेंट्रल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

मराठी समाजातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून संधी देण्यात निर्णय झाला आहे. त्यानंतर आता ही भरती सुरु होणार आहे. येत्या १५-२० दिवसांत य भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी दिली आहे. (Pune Municipal Corporation Recruitment)

पुणे महापालिकेने मागील वर्षी १०० कनिष्ठ अभियंता भरतीची प्रक्रिया सुरु केली होती. त्यासाठी अर्जप्रक्रियादेखील झाली होती. मात्र, कुणबी प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करता येईल, याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता कुणबी प्रमाणपत्र असलेले तरुण ओबीसी प्रवर्गातून अर्ज करता येणार आहेत.

राज्यात विधनासभा निवडणुका पार पडल्यानंतर आता ही भरतीप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा आयबीपीएसद्वारे केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

PMC Recruitment 2025
RBI Jobs: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु; मिळणार भरघोस पगार; अर्ज कुठे अन् कसा कराल?

पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. या भरतीबाबत जाहिरात येत्या १५ दिवसात प्रकाशिक करण्यात येईल. काही तांत्रिक प्रक्रिया पार पाडून १५ जानेवारीपर्यंत भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न आहे, असं पृथ्वीराज बी.पी.अ अतिरिक्त आयुक्त पुण महापालिका यांनी सांगितले आहे.

PMC Recruitment 2025
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षात मिळणार २१०० रुपये; कधी?जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com