IFFCO मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या कधी करू अर्ज शकता?

IFFCO Recruitment 2025: IFFCO ने कृषी पदवीधर प्रशिक्षणार्थी (AGT) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. B.Sc कृषी पदवीधारक नोकरीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2025 आहे.
Job Recruitment
Job Recruitment
Published On

नोकरीचा शोध घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलाइजर को- ऑपरेटिव्ह लिमिटेडने एग्रीकल्चर ग्रॅज्युएट ट्रेनीपदासाठी भरतीची आधीसुचना जाहीर केलीय. इच्छुक उमेदवार अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी IFFCO agt.iffco.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे.

Job Recruitment
Government Job: पर्यावरण मंत्रालयात सरकारी नोकरीची संधी; २ लाख रुपये पगार; पात्रता काय? अर्ज कसा करावा? जाणून घ्या

शैक्षणिक पात्रता काय?

ही नोकरी मिळण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कृषी विषयात बीएससी पदवी मिळवलेली पाहिजे. यासोबतच उमेदवारांना B.Sc मध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेले असावेत. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान गुण ५५ टक्के निश्चित करण्यात आले आहेत.

Job Recruitment
SAIL Recruitment: १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; SAIL मध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

वयाची पात्रता

नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय १ मार्च २०२५ रोजी ३० वर्ष झालेलं असावं. सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाणार आहे. भरती संदर्भातील अधिकृत नियम जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहावी.

कशी होईल निवड

IFFCO AGT भरतीसाठी निवडलेल्या उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन चाचणी आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल. ऑनलाई टेस्ट देशभरातील विविध शहरांमध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. अहमदाबाद, बेंगळुरू, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई, लखनऊ, नागपूर, गुवाहाटी, पटना, रायपूर, सूरत, वाराणसी, चंदीगड, देहरादून, पुणे, हौदराबाद, विजयवाडा, कोचीन, जोधपूर, जम्मू, शिमला, भोपाल, जबलपूर, या शहारांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.

तुम्हाला किती पगार मिळेल?

निवडलेल्या उमेदवारांसाठी १वर्षाचा प्रशिक्षण कालावधी असणार आहे. यात प्रति महिना ३३००० रुपये पगार मिळेल. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्यांना दरमहा ३७००० रुपये पगार मिळेल.

तुम्ही अर्ज कसा करू शकता?

इफको एजीटी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम इफको agt.iffco.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उमेदवारांना वेबसाइटच्या होम पेजवर 'Click Here to Register' वर क्लिक करून त्यांची नोंदणी पूर्ण करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, 'लॉग इन करण्यासाठी येथे क्लिक करा' वर क्लिक करून अर्ज भरावा लागेल. शेवटी भरलेला फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com