Home Guard Bharti: आठवी पास तरुणांनो आजच तयारीला लागा; होमगार्ड पदासाठी भरतीप्रक्रिया सुरू, असा करता येईल अर्ज

Home Guard Bharti 2024: आठवी पास तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. होमगार्डमध्ये भरती सुरु आहे. होमगार्डमध्ये १४३ जागांसाठी रिक्त पदे आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.
Home Guard Bharti
Home Guard BhartiSaam Tv
Published On

जर तुमचे शिक्षण आठवी पास असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. गोवा होमगार्ड आणि सिव्हिल डिफेन्श ऑर्गनायझेनशनने होमगार्डच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून आहे. होमगार्ड भरतीमध्ये १४३ जागांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

Home Guard Bharti
NFL Recruitment: शिक्षण पूर्ण झालंय, पण नोकरी नाही; मॅनेजमेंट ट्रेनीसाठी आहे बंपर भरती; लगेच करा अर्ज

पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आठवी पास असणे गरजेचे आहे. या भरती अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे. यासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयासाठी सूट देण्याची तरतूद केली आहे.

याआधी होमगार्ड असलेल्या उमेदवार या भरतीसाठी पात्र नाही. या भरतीमध्ये उमेदवारांची शारिरीक टेस्टदेखील घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी पुरुष उमेदवारांची उंची किमान ५.५ इंच असावी तर महिला उमेदवारांची उंची किमीन ४.११ इंच असावी. याशिवाय शारिरिक टेस्टमध्ये उमेदवारांची शर्यत घेण्यात येणार आहे. यासाठी पुरुष- १ किलोमीटर (५ मिनिटे) तर महिला- ८८ मीटर (५ मिनिटे ३० सेकंद) अशी पीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.

Home Guard Bharti
Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; 'संगीतकार' पदासाठी भरती; असा करा अर्ज

निवड प्रक्रिया

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, तोंडी परीक्षा आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर केली जाणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल.

Home Guard Bharti
Job Interview Tips: इंटरव्ह्यूला जाण्याआधी अशी तयारी करा; त्याच दिवशी हातात ऑफर लेटर मिळेल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com