Atal Seva Kendra Bharti
Atal Seva Kendra Bharti 2024Saam Tv

Atal Seva Kendra Bharti 2024: 12 वी झालेल्यांना सरकारी नोकरीची संधी,अर्ज करण्यासाठी उरले अवघे काही दिवस

Atal Seva kendra Operator Recruitment 2024: हरियाणा राज्यातील अटल सेवा केंद्रामध्ये ऑपरेटरच्या १५०० पदांसाठी भरती आहे. नोंदणी चालू आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच संपत आलेली आहे.

सध्याचा प्रत्येक तरुणही कामाच्या शोधात आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील तरुणांची सरकारी नोकरी करण्याचा इच्छा असते. त्यासाठी आजची ही बातमी खास तुमच्यासाठी. सध्या हरियाणामध्ये सरकारी नोकरी करण्याची तरुणांची इच्छा पूर्ण होऊ शकते. कारण हरियाणामध्ये ऑपरेटर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. ऑपरेटरसाठी असलेल्या रिक्त पदांसाठी विशेष एक गोष्ट म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे १२ वी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील यासाठी पात्र असेल तर त्यांना या पदांसाठी अर्ज करण्यास त्वरीत सांगा कारण लवकरच अर्ज करण्याची शेवटची तारीख संपणार आहे

Atal Seva Kendra Bharti
Job Alert: बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर! राज्यात १ लाखांहून अधिक रोजगारांची निर्मिती होणार; CM शिंदेंची महत्वाची माहिती

अनेक पदांची भरती.

हरियाणातील ही पदे अटल सेवा केंद्र आणि ऑपरेटरची असून या पदांसाठी निवड झाल्यानंतर सर्व पंचायतींमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या पदांसाठी असलेल्या भरती प्रक्रियेव्दारे एकूण १५०० पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज उमेदवारांना फक्त ऑनलाइनच करता येतील त्यासाठी खाली अधिकृत वेबसाईटची माहिती दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरु शकता.

शेवटची तारीख कोणती

अटल सेवा केंद्र (Center) हरियाणातील ऑपरेटर पदांसाठी अर्ज साधारण २५ जूनपासून सुरु झाले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ६ जुलै २०२४ आहे. तारीख नीट पाहता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत. त्यामुळे कोणताही वेळ न वाया घालवता त्वरीत तुम्ही या पदांसाठी अर्ज दाखल करा. दिलेल्या तारखेनंतर ही संधी परत मिळणार नाही.

अर्ज कसा करायचा आणि कोण अर्ज करु शकतो ?

उमेदवारांना अर्ज (application)करण्यासाठी ' ASKO' च्या अधिकृत असलेल्या वेबसाइटवर जावे लागेल. 'oprecruitment.hpaa.in' ही अधिकृत वेबसाइटवरुन तु्म्हाला अर्ज करता येईल. शिवाय या पदांसाठी १२वी उत्तीर्ण असलेले व्यक्तीच अर्ज करु शकतात. तसेच यासाठी वयोमर्यादा १८ ते ४२ आहे.

अधिक माहिती

अटल सेवा केंद्राच्या ऑपरेटर पदांसाठी करण्यात येणाऱ्या उमेदवाराल लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल त्यानंतर लेखी परिक्षा (exam)उत्तीर्ण झाल्यानंतर त्या उमेदवारांना महत्त्वाच्या आणि आवश्यक असलेल्या कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. या परिक्षेत उमेदवारांना दोन टप्प्याची परिक्षा पार करावी लागते. त्यानंतर त्यातून उमेदवारांची निवड अंतिम असेल.

अर्ज करण्यासाठी फी

दिलेल्या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना साधारण १,००० रुपये शुल्क भरावे लागेल. जर या पदांसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना १२६०० ते २५८०० रुपये प्रति महिना वेतन(salary) आहे.अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊ ती माहिती पाहू शकता.या भरतीची संपूर्ण नोटीस हरियाणाच्या नागरिक संसाधन माहिती विभागाने जारी केली आहे.

Atal Seva Kendra Bharti
Railway Job Alert : रेल्वे लोको पायलट होण्यासाठी किती शिक्षण लागतं? पगार किती मिळतो?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com