SAIL Recruitment: परीक्षा नाही थेट सरकारी नोकरी, महिना १,८०,००० रुपये पगार; SAIL मध्ये भरती सुरु; पात्रता काय?

SAIL Recruitment 2025: सरकारी नोकरी करण्याची संधी तरुणांकडे आहे. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
SAIL Job
SAIL JobSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेलमध्ये मेडिकल कंसल्टंट पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.

सेलमधील या नोकरीसाठी sai.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२५ आहे. (SAIL Recruitment)

SAIL Job
ONGC Job: परीक्षा नाही, थेट लाखोंच्या पगाराची नोकरी, ONGC मध्ये निघाली भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सेलमध्ये १४ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. यामध्ये जनरल मेडिसिन, रिडिओ डायग्नोसिस, स्त्री रोग, जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

सेलमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित मेडिकल क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएशन केलेला असावा. याचसोबत पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री केलेले उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,२०,००० ते १,८०,००० रुपये वेतन मिळणार आहे. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. (Government Job)

SAIL Job
CIDCO Job: सिडकोमध्ये नोकरी अन् १७१००० रुपये पगार; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६९ वर्षे असावी.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. सर्वप्रथम कागदपत्रे पडताळणी केली जाईल. त्यानंतर इंटरव्ह्यू घेतला जाईल. यानंतर मेरिट लिस्ट बनवून उमेदवारांची निवड केली जाईल.

नीती आयोगात भरती

सध्या निती आयोगातदेखील नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. निती आयोगात स्टाफ कार ड्रायव्हर ते प्रोटोकॉल ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. १०वी पास ते पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

SAIL Job
Anganwadi Jobs: परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० रिक्त जागा; अर्ज कसा कराल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com