Government Job: निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी; पगार तब्बल ५०,००० हजार रुपये; जाणून घ्या सर्वकाही

Government Job For Retired People: निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. सेंट्रल पल्प अँड पेपर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती सुरु आहे.
Government Job
Government JobSaam Tv
Published On

तुम्ही रिटायर्ड आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सेंट्रल पल्प अँड पेपर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंघी तुमच्याकडे आहे. या सरकारी संस्थेत सल्लागार पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही CPPRE च्या अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात. cppri.res.in या वेबसाइटवर सर्व माहिती देण्यात आली आहे.

Government Job
Bank Jobs: बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. सेंट्रल पल्प अँड पेपर रिसर्च इन्स्टिट्यूट उत्तर प्रदेश, सहारणपूर येथे ही भरती केली जाणार आहे. सल्लागाण श्रेण १ आणि २ अशा दोन पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

सल्लागार पदााठी सरकारी/पीएसयू/ विद्यापीठ/ संशोधन संस्था / स्वायत्त संस्थेतून निवृत्त झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सचिव किंवा समकक्ष पदावर तीन वर्षांचा अनुभव असायला हवा. सल्लागार ग्रेड I पदासाठी स्टेनोग्राफर किंवा सेक्शन ऑफिसर या पदावर ५ वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्ही अधिसूचनेत तपासू शकतात.

Government Job
ESIC Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; ESIC मध्ये भरती; पगार १२३००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा कराल?

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. सल्लागार ग्रेड ३ पदासाठी ५०,००० रुपये पगार मिळणार आहे. सल्लागार ग्रेड १ पदासाठी ३०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. हा इंटरव्ह्यू २४ मार्च रोजी होणार आहे. यासाठी सकाळी ९ वाजता सेंट्रल पल्प अँड पेपर रिसर्च इन्स्टिट्यूट, सहारनपूर, उत्तर प्रदेश २४७००१ येथे उपस्थित राहायचे आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे.

Government Job
Income Tax Job: आयकर विभागात नोकरीची सुवर्णसंधी; पगार ८१००० रुपये; पात्रता काय? अशा पद्धतीने करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com