ESIC Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; ESIC मध्ये भरती; पगार १२३००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा कराल?

ESIC Recruitment 2025: कर्मचारी विमा निगममध्ये सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. तुम्हाला कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळणार आहे.
ESIC Recruitment
ESIC RecruitmentSaam Tv
Published On

सरकारी नोकरी करायचीये तर ही बातमी तुमच्यासाठी. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.ईएसआयसीमध्ये विविध विभागांमध्ये भरती सुरु आहे. यामध्ये प्रोफेसर, असोसिएटस प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि सिनियर रेजिडेंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (ESIC Recruitment)

ESIC Recruitment
IPPB Recruitment: इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

या नोकरीबाबत सविस्तर माहिती esic.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या भरती मोहिमेत ११३ पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी तुम्ही २० मार्चपर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६९ वर्षे असावी. सिनियर रेजिडेंट पदासाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. (ESIC Recruitment 2025)

प्रोफेसर पदासाठी १,२३,१०० रुपये पगार मिळणार आहेत. असोसिएट प्रोफेसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ७८,८०० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टेटं प्रोफेसर पदासाठी ६७,७०० रुपये पगार मिळणार आहे तर सिनियर रेजिडेंट पदासाठी ६७७०० रुपये पगार मिळणार आहे. याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना विविध भत्तेदेखील मिळणार आहे.

ESIC Recruitment
Bombay High Court Job: फक्त सातवी पास उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी; मिळेल भरघोस पगार, येथे करा अर्ज

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.या नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि फॉर्म भरावा लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज तुम्हाला डीन, ईएसआयसी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, ६ वा मजला, नंदा नगर, इंदौर ४५०११ येथे पाठवायचे आहे.

ESIC Recruitment
Desk Job Risks: तासनतास बसून काम करण्याचे दुष्परिणाम; आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com