BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. लोकल बँक ऑफिसर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
Bank Of Baroda Recruitment
Bank Of Baroda RecruitmentSaam Tv
Published On

सरकारी बँकेत चांगली नोकरी करण्याची उत्तम संधी तरुणांकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची संधी आहे. बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. चांगल्या सरकारी बँकेत नोकरी मिळाल्यावर करिअर चांगलं होतं. बँक ऑफ बडोदाने लोकल बँक ऑफिर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. तब्बल २५०० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Bank Of Baroda Recruitment
Government Jobs: दहावी उत्तीर्ण असाल तरी नौदलात मिळेल नोकरी; जाणून घ्या पगार अन् अर्ज प्रक्रिया

बँक ऑफ बडोदाने लोकल बँक ऑफिसर पदासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ४ जुलैपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइनन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही भरती आयबीपीएसद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला ibpsonline.ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

भरती (Bank Of Baroda Recruitment)

ही भरती रेग्युलर बेसवर केली जाणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही भरती होणार आहे. महाराष्ट्रात ४८५ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.गुजरातमध्ये ११६० रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.

Bank Of Baroda Recruitment
Government Jobs: दहावी उत्तीर्ण असाल तरी नौदलात मिळेल नोकरी; जाणून घ्या पगार अन् अर्ज प्रक्रिया

पात्रता (Eligibility)

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. इंटीग्रेटेड ड्युअल डिग्रीप्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. ज्या उमेदवारांकडे चार्टर्ड अकाउंट्ट, कॉस्ट अकाउंटंट, इंजिनियरिंग किंवा मेडिकल विषयात पदवी प्राप्त केलेली असेल ते उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १ वर्षाचा कामाचा अनुभव असावा. उमेदवाराने कमर्शियल बँक, रिजनल रुरल बँक, को-ऑपरेटिव्ह बँकेत काम केलेले असावे. उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावी.या नोकरीबीबत अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.

Bank Of Baroda Recruitment
Government Job: खुशखबर! गृह मंत्रालयात नोकरीची संधी, पगार २१५९०० रुपये, अर्ज कसा करावा?

पगार (Bank Of Baroda Salary)

या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.लोकल बँक ऑफिसर पदासाठी निवड झाल्यावर ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळणार आहे.

निवड प्रक्रिया

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये फी भरावी लागणार आहे.

Bank Of Baroda Recruitment
BMC Jobs : मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; महिन्याला पगार ३०,००० रुपये; कुठे अन् कसा अर्ज करणार? घ्या जाणून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com