अमेरिकेनंतर भारतातही झोम्बीचा शिरकाव, भारतीय तरुणाई झोम्बी ड्रग्जच्या विळख्यात?

Zombie Drug Scare Reaches India: जीवंत तरुण चक्कं पुतळे बनलेत... ही दृश्य कुठल्या हॉलिवूड चित्रपटातील नाहीत... तर ही दृश्ये आहेत झोम्बी ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईची...
Young individuals reportedly affected by the deadly “zombie drug” xylazine, showing alarming physical and behavioral symptoms.
Young individuals reportedly affected by the deadly “zombie drug” xylazine, showing alarming physical and behavioral symptoms.saam tv
Published On

आधी चंदीगडमध्ये डिलिव्हरी बॉय, बिहारमध्ये मोटारसायकलवरचा तरुण आणि त्यानंतर आता बंगळुरमध्येही तरुणाई जीवघेण्या झोम्बी ड्रग्जच्या विळख्यात सापडलीय.. अवघ्या 2 तासात स्वतःवरचा कंट्रोल घालवून मागे पुढे झिंगायला लावणारं.. नाही तर उभ्या उभ्याच बेशुद्ध करणारं झोम्बी ड्रग्ज देशात वेगानं पसरतं असल्याचं म्हटलं जातंय... चीनच्या प्रयोगशाळेतून जसा कोरोना जगभर पसरला.. आणि जगात मृत्यूचं तांडव माजलं... अगदी तसंच अमेरिकेनं गाई आणि घोड्यांना भूल देण्यासाठी तयार केलेल्या झायलझीन नावाच्या ड्रग्जनं जगाचं टेन्शन वाढवलंय... आधी लॅटिन अमेरिकेत हैदोस घालणाऱ्या आणि तरुणाईला झिंगवणाऱ्या या ड्रग्जचा आता भारतातही शिरकाव झाल्याची चर्चा रंगलीय... काय आहे हे झायलाझीन पाहूया

जनावरांना भूल देण्यासाठी बनवलेलं झायलाझीन हे ड्रग्ज स्वस्त किंमतीत मिळतं... व्हेटर्नरी मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असतं... हे ड्रग्ज फेन्टाईल या अतिशय घातक ड्रग्जसोबत घेतलं जातं... त्यामुळे त्याची नशा अनेक तास टिकते... आणि व्यक्ती कित्येक तास बेफानपणे एकाच जागी स्थिर राहते... एवढंच नाही तर या ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे तरुणांचा मृत्यूही होण्याची शक्यता असते.

जनावरांसाठी बनवलेलं ड्रग्ज आता माणसांच्या पिढ्याच्या पिढ्या संपवायला निघालंय... हे ड्रग्ज नसांमधून घेतलं जातं... त्यातील फेंटाईलमुळे नसा सडतात... त्वचेवर जखमा होतात... श्वासांची गती कमी होते... आणि शरीरभर संसर्ग पसरु लागतो... त्यामुळे अनेकदा हातपाय कापावे लागू शकतात... या ड्रग्जच्या परिणामांबाबत साम टीव्हीनं आरोग्य तज्ज्ञांकडून माहिती घेतलीय..

अमेरिका, युरोप, ऱशियातील तरुण झोम्बी ड्रग्जचे शिकार झाल्याचं समोर आलंय.... मात्र जी भीती होती तेच घडलंय.. आता भारतीय तरुणाई झोम्बीसदृशय् ड्रग्जची शिकार होत असल्यानं सरकारनं या प्रकरणी माहिती घेऊन तातडीनं उपाययोजना करायला हव्यात.नाहीतर भविष्यात भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com