भूदरापुरा : एकतर्फी प्रेम One Side Love करणाऱ्या प्रियकराबरोबर लग्नासाठी दबाव आणि धमकीने त्रस्त झालेल्या, तरुणीने आत्महत्या Suicide केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहे. भूदरापुरा Bhudrapura या ठिकाणी राहणारे चंदूभाई परमार एका गॅरेजमध्ये काम करत होता. त्यांची मुलगी आरती हिचे ५ वर्षांपूर्वी अरावली Aravali येथील निवासी विष्णूभाई याच्यासोबत लग्न झाले होते.
हे देखील पहा-
आरतीच्या सासरी राहणारा एक तरुण तिचा पती घरी नसताना नेहमी आरतीला त्रास देत असत. अनेकदा तो आरतीवर जबरदस्ती देखील केली होती. आरती आपला पती आणि मुलांसह अहमदाबाद या ठिकाणी राहायला आली होती. दोघे आपल्या मुलासह सिंधुभवन रोड या ठिकाणी राहत होते. दिनेश याला आरती अहमदाबादमध्ये राहायला आल्याचे कळताच तोदेखील अहमदाबाद Ahmedabad या ठिकाणी आला आणि वराज त्या ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहू लागला.
काही दिवसांअगोदर दिनेश जेव्हा तिथे आला. तेव्हा आरती आपल्या वडिलांच्या घरी आलेली होती. यानंतर दिनेश तिच्या वडिलांच्या इमारतीखाली गेला आणि आरतीला खाली बोलावले होते. त्याने आरतीला सोबत येण्यास सांगितले होते. अन्यथा पती आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली होती. जेव्हा तिच्या पतीला याबाबत कळले आहे.
यानंतर त्याने आरतीच्या वडिलांना याबाबत कळवले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी आरतीने सातव्या मजल्यावर जाऊन उडी मारून आत्महत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दिनेश याच्याविरोधात आत्महत्येसं प्रवृत्त केल्याचे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरतीच्या आत्महत्येनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एकतर्फी प्रेमाला वैतागून, आरतीने सातव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केलेली आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.