Shocking : डीजेच्या तालावर नाचताना मुलगी बेधुंद झाली; अचानक आला हृदयविकाराचा झटका, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

girl died while dance : डीजेच्या तालावर नाचताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलीच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
girl died while dance
bihar news Saam tv
Published On

बिहारच्या शिवहार जिल्ह्यातील एका मुलीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. डीजेच्या तालावर बेंधुद होऊन नाचताना मुलीला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. डीजेच्या तालावर नाचताना मुलीची तब्येत बिघडल्याची माहिती अनेक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर आणि नर्सने निष्काळजीपणा केल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. मुलीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी लोकप्रतिनिधी पोहोचले. तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. या लोक प्रतिनिधीने रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

girl died while dance
Shocking : महाराष्ट्र हादरला! नराधमाने 'खाकी'ची लाज घालवली; पोलीस बापाकडून पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार

मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यानंतर मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

girl died while dance
Pune News : गाडी बाजूला थांबवली, त्यानंतर घाणेरड्या नजरेने बघू लागला अन्...; पुण्यातील महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव

लग्नात नाचताना तरुणाचा मृत्यू

दोन महिन्यापूर्वी देखील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तरुण चुलत भावाच्या लग्नात बेधुंद नाचला. नाचत असताना या तरुणाची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर तो खाली कोसळला. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या कोतवालीमधील पोखरभिंडा गावात ही घटना घडली होती. तरुणाच्या मृत्यूमुळे लग्नातील आनंदाच्या वातावरणावर शोककळा पसरली.

girl died while dance
Bangaluru Stampede : आई-वडील रॅलीत मुलीला शोधत राहिले, काही वेळाने मृत्यूची वार्ताच धडकली, कुटुंबावर कोसळलं आभाळाएवढं दु:ख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com