

बिहारच्या मॅनपुरीमध्ये क्रिकेट खेळताना १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विराट चौहान गोलंदाजी करताना त्याच्या छातीत दुखू लागलं. काही वेळाने जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला. कुटुंबातील सदस्यांनी विराटला रुग्णालयात दाखल केलं. परंतु विराट चौहानला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
विराट हा इयत्ता सहावीत शिकत होता. डॉक्टरांनी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्याच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. विराट सिंह हा गावातील अनारा एज्युकेशन अकॅडमीमध्ये शिक्षण घेत होता.
विराट रविवारी मित्रांसोबत मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला. मैदानात बॉलिंग करत असताना त्याच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यानंतर विराट थेट जमिनीवर कोसळला. मैदानातील मुले घाबरून गेले. त्यांनी त्याच्या कुटुंबीयांना बोलावून घेतलं. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं.
मित्राने सांगितलं की, 'आम्ही लोक क्रिकेट खेळत होते. विराट बॉलिंग करण्यासाठी आला. त्याने षटकाचा पहिला बॉल टाकला. पहिला बॉल टाकल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागलं. तरीही त्याने तीन बॉल टाकले. परंतु त्रास वाढल्याने विराट जमिनीवर कोसळला. पुढे काही मिनिटात बेशुद्ध झाला'.
'विराटला त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा रुग्णालयात नेताना रस्त्यात मृत्यू झाला होता, असे मित्राने सांगितले. त्याच्या मृत्यूने त्याचे कुटुंबीय आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विराट राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.
विराटचे वडील शेतकरी आहेत. ते काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच तातडीने घरी आले. मुलाच्या मृत्यूने त्याची आई आणि बहिणी रडून बेहाल झाल्या आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.