पत्नी वारंवार पोलीस तक्रार, आत्महत्येची धमकी देत असेल तर तो पतीवर अत्याचार : हायकोर्ट

पत्नीकडून वारंवार पोलीस तक्रार आणि आत्महत्येची धमकी दिली जात असेल तर, तो पतीवर अत्याचार मानला जाईल, असे निरीक्षण नोंदवताना हायकोर्टानं पतीची घटस्फोटाची मागणी मान्य केली.
Wife-Husband divorce (file photo)
Wife-Husband divorce (file photo)SAAM TV
Published On

चंदीगड: देशातील न्यायालयांमध्ये मोठ्या संख्येने घटस्फोटाच्या प्रकरणांवर सुनावणी घेतली जाते. असंच एका प्रकरणावर पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायाधीश रितू बाहरी आणि न्यायाधीश मीनाक्षी आय मेहता यांच्या खंडपीठानं पंचकुलाच्या फॅमिली कोर्टाने दिलेला निकाल रद्दबातल करतानाच, एका व्यक्तीने पत्नीपासून घटस्फोटाची केलेली मागणी मान्य केली. (husband wife relationship)

Wife-Husband divorce (file photo)
Rapper Raftaar Divorce: रॅपर रफ्तार लग्नाच्या ६ वर्षानंतर देणार पत्नी कोमल वोहरला घटस्फोट

जर कुणी महिला पोलीस ठाण्यात (Police) पतीविरोधात किंवा त्याच्या कुटुंबाविरोधात वारंवार तक्रार करत असेल किंवा वारंवार त्याला आत्महत्येची धमकी देत असेल तर, तो पतीवर अत्याचार असेल असे मानले जाईल, असे स्पष्ट मत कोर्टाने यावेळी नोंदवले.

हायकोर्टाने (High court) या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान सांगितले की, 'पत्नीकडून पोलिसांत देण्यात आलेली तक्रार जरी मागे घेतली, तरी हा प्रकार पतीसाठी त्रासदायक ठरतो.' हायकोर्टाने या प्रकरणाच्या सुनावणीवेळी दिलेल्या निर्णयात म्हटलं की, यात पती-पत्नी सात वर्षांपासून वेगळे राहत आहेत. अशावेळी हा विवाह निष्क्रिय म्हणता येऊ शकतो.' हायकोर्टानं या आधारे पतीची घटस्फोटाची मागणी मान्य केली आहे.

Wife-Husband divorce (file photo)
Vijay Mallya Case : विजय मल्ल्यास सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; चार महिने तुरुंगवास

हे प्रकरण २०१९ मध्ये पंचकुलाच्या फॅमिली कोर्टानं रद्द केलेले आहे. पतीने (Husband-wife) याचिकेत म्हटलं होतं की, त्याचं लग्न २६ सप्टेंबर २०१४ रोजी झालं होतं. या दाम्पत्याला मूल नाही. त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत आहे. पत्नी माहेरी राहायला गेल्यानंतर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आहे. तसेच वारंवार आत्महत्येची धमकीही दिली जात आहे, असे पतीने याचिकेत म्हटलं होतं. त्याच्या पत्नीने २ मार्च २०१५ रोजी क्राइम अगेन्स्ट वुमेन्स सेलमध्ये आई, बहिणीसह कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर ती तक्रार मागे घेत असल्याचे तिने म्हटले होते. या दरम्यान, सर्वांना पाच वेळा पोलिसांत हजर राहावे लागले होते, असे त्याने याचिकेत म्हटलं होतं.

सर्व आरोप खोटे असल्याचे पत्नीचे म्हणणे

पतीच्या याचिकेनुसार, त्याच्या पत्नीने अंबालाच्या पोलीस अधीक्षकांकडेही त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यावर कारवाई करताना पोलिसांना त्याला अटकही केली होती. तसेच त्याला सहा वेळा पोलिसांत हजर राहावे लागले होते. त्यानंतर पत्नीने कोर्टात कोणताही जबाब नोंदवला नव्हता. त्यामुळे त्याला आरोपमुक्त करण्यात आले होते. पत्नीकडून क्राइम अगेन्स्ट वुमेन सेलमध्ये वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याच्यासाठी ही बाब त्रासदायक होती. पत्नीनेही हायकोर्टात जबाब नोंदवला होता. पतीने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे तिने म्हटले होते. हुंड्यापोटी त्याने कारही मागितली होती, असा आरोप तिने केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com