पत्नीने 8 वर्षांपासून संबंध ठेवू दिले नाहीत, खासदाराची याचिका; न्यायालयाने दिला हा निर्णय

ओडियाची चित्रपट अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी आणि अभिनेते-लोकसभा खासदार अनुभव मोहंती यांचा घटस्फोट सध्या चर्चेचा विषय आहे.
Varsha Anubhav
Varsha AnubhavSaam Tv
Published On: 

ओडियाची चित्रपट अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी (Varsha Priyadarshini) आणि अभिनेते-लोकसभा खासदार अनुभव मोहंती (Anubhav Mohanty) यांचा घटस्फोट (Divorce) सध्या चर्चेचा विषय आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून अनुभव मोहंती यांच्या याचिकेवर कटकच्या एडीजेएम न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

न्यायालयाने वर्षा प्रियदर्शिनी यांना अनुभव मोहंती यांचे वडिलोपार्जित निवासस्थान दोन महिन्यांत सोडण्याचे आदेश दिलेत. त्याचबरोबर अनुभव मोहंती यांनी वर्षाला दरमहा 30 हजार रुपये देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनुभव यांनी वर्षाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. “मी तिच्यासाठी स्वतंत्र घराची व्यवस्था करण्यास तयार आहे. तिने माझे वडिलोपार्जित घर सोडावे,” असे त्यांनी एका याचिकेत म्हटले होते. याशिवाय दुसऱ्या याचिकेत त्यांनी वर्षा यांच्या उत्पन्नाचे स्रोत उघड करण्याची मागणीही केली. न्यायालयाने गेल्या आठवड्यात सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता.

Varsha Anubhav
विमानतळावर अन् विमानात मास्क लावला नाही तर...; कोविड नियमांबाबत दिल्ली HC चे कडक निर्देश

तर या प्रकरणावर खासदार अनुभव मोहंती यांनी सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केलेला आहे. खासदाराने सहा वर्षांपूर्वी आपल्या पत्नीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की माझी पत्नी शारीरिक संबंधांना परवानगी देत ​​नाही. याशिवाय, त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, आमच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत, परंतु त्यांच्या पत्नीने अद्याप संबंध ठेवण्याची परवानगी दिलेली नाही.

हे देखील पाहा-

तसेच खासदाराने सांगितले होते की, त्यांनी आपल्या पत्नीशी या नात्याबद्दल अनेकदा बोलले आहेत, यावर अभिनेत्री वर्षा हिनेही याचिका दाखल करून प्रतिक्रिया दिली आहे. तिने पती अनुभववर आई होण्याचा अधिकार नाकारल्याचा आरोप केला. तर तिचा पती मद्यपी असून त्याचे इतर महिलांशीही अवैध संबंध असल्याचे तिने याचिकेत म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com