विमानतळावर अन् विमानात मास्क लावला नाही तर...; कोविड नियमांबाबत दिल्ली HC चे कडक निर्देश

दिल्ली उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी विमानतळ आणि विमानांमध्ये फेस मास्कची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
Air Passangers
Air PassangersSaam Tv
Published On

दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) आज शुक्रवारी विमानतळ आणि विमानांमध्ये फेस मास्कची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती (ACJ) विपिन संघी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, जे विमानतळावर आणि विमानात मास्क लावणार नाहीत त्यांना मोठा दंड ठोठावला जाणार आहे. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि आवश्यकता भासल्यास उल्लंघन करणाऱ्यांना 'नो फ्लाईंग झोन'मध्ये समाविष्ट करावे, असे खंडपीठाने म्हटले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, फक्त अन्न खाताना मास्क काढण्यास सूट देण्यात आली आहे.

Air Passangers
Photos: IIFA 2022 साठीचा हँडसम शाहिद कपूरचा कुल लूक...

याचिकाकर्ते म्हणाले की, प्रवासादरम्यान त्यांनी पाहिले आहे की लोक मास्क घालत नाहीत. विमान आणि विमानतळावर कोविड नियमांचे (Covid Restrictions) उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा धोका कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

हे देखील पाहा-

पालन ​​न करणाऱ्यांना 'नो फ्लाईंग झोन'मध्ये ठेवण्याची मागणी;

आदेशानुसार, DGCA ने विमानतळ, विमानातील कर्मचार्‍यांना मास्क आणि हाताच्या स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या प्रवाशांवर आणि इतरांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत. अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल करून दंड ठोठावण्यात यावा आणि त्यांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यात यावे. खंडपीठाने पुढे म्हटले की, कोविड महामारी संपलेली नाही आणि ती वेळोवेळी रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे आपण त्याबाबत जागरूक राहण्याची अत्यंत गरज आहे./

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com