Ghaziabad Crime News : उत्तर प्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉससोबत असलेल्या प्रेमसंबंधासाठी एका तरुणीला मृत्यूची शिक्षा भोगावी लागली आहे. या घटनेने उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडालीये.
उत्तर प्रदेशातील या घटनेनं संपूर्ण देश हादरुन गेलाय. या हत्येत पत्नीने आपल्या भावाच्या मदतीने नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला जीवानिशी मारलंय. पतीचे अनैतिक संबंध पत्नीला समजल्याने रागात तिने टोकाचं पाऊल उचललं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पतीच्या अनैतिक संबंधाबद्दल पत्नीला कळल्यानंतर अनेकदा सांगूनही पतीने त्याचे अनैतिक संबंध थांबवले नाही. याच कारणामुळे पत्नीने आपल्या भावाच्या साथीने पतीच्या प्रेयसीवर गोळ्या झाडल्यात. नंतर हा मृतदेह पुलावरुन खाली नदीत फेकून दिलाय. रागिणी असे मृत महिलेचे नाव आहे.
पुरावे लपवण्यास नवऱ्यानेच केली मदत
बंटी असं आरोपी महिलेच्या पतिचे नाव आहे. तसेच राखी असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. या सर्व घटनेचा तपास गाझियाबाद पोलिस घेत आहेत. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. २१ वर्षीय रागिणीचे गेल्या काही वर्षांपासून बंटीसोबत प्रेमसंबंध होते. यामुळे बंटीची पत्नी राखीला या गोष्टीचा प्रचंड राग यायचा. पतीच्या अनैतिक संबंधामुळे रागाच्या भरात राखीने आपल्या भावासोबत रागिणीच्या हत्येचा डाव रचला.
राखीच्या भावाने आधी तिला भेटायला बोलावले. त्यानंतर हिंडन नदीच्या काठावर तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तिचा मृतदेह पुलावरुन खाली फेकून दिला. विशेष म्हणजे, पत्नी आणि भावाच्या प्लॅनविषयी पती बंटीला कळल्यावर तो पोलिसात गेला नाही. तर उलट या दोघांना पुरावे नष्ट करण्यास त्याने मदत केली. असे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणात गाझियाबाद पोलिसांनी सध्या ५ जणांना अटक केली आहे. यासोबत फरार झालेल्या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. राखीच्या भावाने त्याच्या मित्रांच्या मदतीने तरुणीचा खून केलाय. या प्रकरणात तिच्या भावासोबत असणाऱ्या अन्य व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे. हत्येची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पोलिसात तक्रार करण्याऐवजी पुरावे लपवण्यास मदत केली यासाठी बंटीलाही अटक करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.