Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी होऊ शकतात जाहीर? समोर आली मोठी अपडेट

Election Commission of India: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
When can Lok Sabha election dates be announced? A big update has come out
When can Lok Sabha election dates be announced? A big update has come out Saam Tv
Published On

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यातच निवडणूक आयोग सोमवार ते बुधवार जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. या दरम्यान केंद्रशासित प्रदेशात निवडणुका कधी घेतल्या जाऊ शकतात, याबाबत निर्णय होऊ शातो.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करू शकतो. गुरुवारी किंवा शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. या केंद्रशासित प्रदेशात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही होऊ शकतात, असे बोलले जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

When can Lok Sabha election dates be announced? A big update has come out
Satara News: दरडग्रस्तांना मिळणार हक्काची घरे, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

लोकसभा निवडणुकीपूर्वी आयोगाने शुक्रवारी गृह मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांशी या विषयावर बैठका घेतल्या. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसह जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याच्या शक्यतेवर निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.  (Latest Marathi News)

आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ जूनमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. अशातच येथे लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका होऊ शकतात.

When can Lok Sabha election dates be announced? A big update has come out
BJP- TDP: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मिळाला नवा मित्रपक्ष, टीडीपी एनडीए आघाडी सामील

आदर्श आचारसंहितेपूर्वी घोषणांचा पाऊस

दरम्यान, निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू होईल. याआधी राजकीय पक्ष मोठमोठी आश्वासने देत असून वेगवेगळ्या प्रकल्पांची उद्घाटने होत आहेत. लोकसभा निवडणुका एप्रिल-मेमध्ये होऊ शकतात. यातच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह इतर पक्षांनीही आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशातील लोक आता अधिक प्रतीक्षा करू शकत नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच निवडणुका होतील, अशी आशा आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात यावा, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com