WhatsApp वर बॅन केलंय ? घाबरु नका, 'या' फिचरमुळं होणार रिस्टोर

सर्वात लोकप्रिय झालेल्या व्हाटस् अॅपने युजर्ससाठी एक भन्नाट फिचर आणले आहे.
What's app new feature
What's app new featureSaam TV
Published On

दैनंदिन जीवनाताली अविभाज्य घटक बनलेल्या आणि सर्वात लोकप्रिय झालेल्या व्हाटस् अॅपने (WhatsApp New Feature) युजर्ससाठी एक भन्नाट फिचर आणले आहे. या दमदार फिचरला विशेष महत्व देण्यात आलं आहे. कारण बॅन झालेल्या अकाऊंटला रिवोक करण्यासाठी हे फिचर फायदेशीर ठरणार आहे. अनेकवेळा युजर्सच्या (whats app users) व्हाट्स अॅप अकाउंटला बॅन केलं जातं. यामागे अनेक कारणे असू शकतात, पण तुम्ही अकाऊंट पुन्हा सुरु करण्यासाठी एकदा प्रयत्न नक्की करु शकता. अशाच प्रकारचा एक फिचर कंपनीच्या लेटेस्ट अपडेट मध्ये ऑनलाईन (online) दाखवण्यात आला आहे.

What's app new feature
Mumbai Rain Alert : मुसळधार पावसाने झोडपलं, मुंबईसह कोकणाला यलो अलर्ट

waBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी व्हाट्सअॅपच्या या फिचरची चाचणी करत आहे. या फिचरद्वारे तुम्ही रद्द केलेल्या व्हाट्सअॅप अकाऊंटला पुन्हा सुरु करण्यासाठी कंपनीकडे मागणी करु शकता. जे युजर्स व्हाट्सअॅपच्या नियमांचे दर महिन्याला व्हाट्स अॅप हजार अकाऊंट्सवर बंदी घालतो, जे युजर्स व्हाट्स अॅपच्या नियमांचे पालन करत नाहीत, कंपनी दर महिन्याला अशाप्रकारच्या हजार अकाऊंट्सवर बंदी घालते. अशातच कंपनीने आता या फिचरच्या माध्यमातून युजर्सच्या अकाऊंटला अनब्लॉक करण्याची संधी दिली आहे.

रिपोर्टनुसार, जेव्हा युजर्स त्यांच्या बॅन केलेल्या अकाऊंटला लॉग इन करायचा प्रयत्न करतील, तेव्हा त्यांना अॅपमध्ये असलेल्या व्हाट्स अॅप सपोर्ट्सद्वारे कॉन्टक करण्याचा विकल्प मिळेल. आता तुम्हाला मेसेजिंग अॅपमध्ये विकल्प मिळत नाहिय. तसेच तुम्हाला तुमचा अकाऊंट पुन्हा एकदा रिवोक करण्याचा विकल्पही दिसणार नाहिय. त्यासाठी तुम्हाला कंपनीच्या सपोर्ट पेजवर जावं लागेल आणि तिथे रिव्यू रिक्वेस्ट पाठवावी लागेल.

What's app new feature
Ind vs Eng : भारताविरुद्ध टी-२०, वनडे मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, संधी कुणाला? पाहा यादी

व्हाट्स अॅपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जन अॅपमध्ये बॅन केलेल्या अकाऊंट्ससाठी रिवोकचा ऑप्शन दाखवला जातो. एकदा तुम्ही या विकल्पाला सिलेक्ट केलं की, व्हाट्स अॅप सपोर्ट तुमच्या अकाऊंट आणि डिवाईसच्या माहितीचा रिव्यू घेणार. जेव्हा तु्म्ही रिक्वेस्ट फॉर रिव्यू करता त्यावेळी तुम्हाला अतिरिक्त माहिती द्यावी लागेल.

रिव्यू पाठवल्यानंतर तुमचा अकाऊंट रिवोक केलं जाण्याची शक्यता आहे. तुमचा अकाऊंट चुकीच्या पद्धतीमुळं बॅन केलं आहे, असं कंपनीच्या निदर्शनास आल्यावर अकाऊंट रिवोक केला जाईल. विशेष म्हणजे तुम्हाला व्हाट्स अॅपच्या नियमांच उल्लंघन झालं नाही, याची खात्री करावी लागणार आहे, कारण कंपनीकडून तुम्हाला तिसरी संधी दिली जाणार नाही. हा फिचर कधी लॉंच केला जाईल, याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com