गॅस सबसिडीचे पैसे पाहायला गेली अन् बँक खात्यातील १०० कोटींची रक्कम पाहून महिला चक्रावली, नेमकं प्रकरण काय?

LPG subsidy status : एलपीजी गॅस सबसिडी जमा झाली का हे तपासण्यासाठी बँकेत गेलेल्या पश्चिम बंगालमधील एका महिलेला मोठा धक्का बसला. पासबुकमध्ये तब्बल १०० कोटी रुपये शिल्लक दिसल्यानंतर बँकेने खाते गोठवत चौकशी सुरू केली.
A woman checking her bank passbook after an unexpected ₹100 crore balance appeared during an LPG subsidy inquiry.
Woman stunned after passbook displays nearly ₹100 crore instead of LPG subsidy.Saam TV AI Image
Published On

एलपीजी गॅसची सबसिडी जमा झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी बँकेत गेलेल्या एका महिलेला धक्का बसला, ज्याची त्या महिलेने स्वप्नातही कल्पना केली नसेल. बँक खात्याचे पासबुक प्रिंट करताच खात्यात तब्बल १०० कोटी रुपये जमा झाल्याचे समोर आले अने त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. पासबुकवरील ही चक्रावणारी रक्कम पाहून महिला आणि तिचे कुटुंब हादरून गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील ३६ वर्षांची महिला नेहमीप्रमाणे आपल्या गॅस सबसिडीचे पैसे खात्यात आले की नाही? हे पाहण्यासाठी बँकेत गेली होती. पण त्या महिलेने पासबूकवरील शिल्लक रक्कम (बॅलन्स) पाहिला अन् विश्वासच बसला नाही. कारण तेव्हा तिच्या खात्यात १०० कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याचे दिसत होते. एकाच रात्रीत खात्यात इतकी मोठी रक्कम आल्याचे पाहून बँक कर्मचाऱ्यांचेही अवाक झाले. ही रक्कम बँकेच्या चुकीमुळे महिलेच्या खात्यात जमा झाली का? की यामागे वेगळे कारण आहे? याचा तपास आता बँकेचे अधिकारी आणि प्रशासनाकडून केला जात आहे. या धक्कादायक घटनेची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

A woman checking her bank passbook after an unexpected ₹100 crore balance appeared during an LPG subsidy inquiry.
Ladki Bahin Yojana: तब्बल इतक्या लाख महिला झटक्यात योजनेतून बाहेर, अधिकृत डेटा जाहीर, तुमचे नाव यात नाही ना?

३६ वर्षीय काश्मिरा शेख या महिलेच्या खात्यात १०० कोटींची रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. काश्मिरा आपल्या एलपीजी सिलेंडरवरील सबसिडी जमा झालेली पाहण्यासाठी बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील पीएनबीच्या कुलतली जामताला शाखेत गेल्या होत्या. पासबुक प्रिंट झाल्यानंतर बँक अधिकाऱ्याने त्यांच्या खात्यात ९९,९९,९९,९९७ रुपये जमा झाल्याचे सांगितले. यावर काश्मिराला आणि त्या बँक अधिकाऱ्यालाही विश्वास बसला नाही. त्याने अनेकदा रक्कम तपासली पण खात्यावर १०० कोटी दाखवत होते.

A woman checking her bank passbook after an unexpected ₹100 crore balance appeared during an LPG subsidy inquiry.
Weather Alert : राज्यातील ११ जिल्ह्यांत २४ तास मुसळधार; विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ घालणार पाऊस, IMD चा अंदाज

नवऱ्याच्या पिशव्या शिवण्याच्या व्यावसायाला हातभार लावण्यासाठी काश्मिरा मदत करते. पण आता १०० कोटींची मालकीन झाली आहे. बँकेने चौकशीनंतर तिचे एकमेव बँक खाते गोठवले. काश्मिरा आपल्या खात्यात जमा झालेले पैसे वापरू शकत नाही. अनधिकृतपणे यामागे संपूर्ण बंगालमधील बँकिंग व्यवहारांवर परिणाम करणाऱ्या सर्व्हरमधील संभाव्य बिघाडाला जबाबदार धरले जात आहे. पीएनबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या 'प्रकरणाचा' आढावा घेतला जात आहे, परंतु बँकेने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com