

भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय
कमळ यात्रा आणि घराघर संपर्क मोहिमेचा मोठा प्रभाव
फुटबॉल सामन्यांद्वारे तरुणांशी संवाद
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षानं शानदार विजय मिळवत १५ वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या टीएमसीला हद्दपार केलंय. पश्चिम बंगालमधील भाजपचा विजय फक्त सभा आणि रॅलींमुळे आला नाहीये. तर ती एक शानदार आणि आखलेल्या जबरदस्त रणनीतीचा परिणाम आहे. कमल यात्रा, फुटबॉल सामने आणि जवळपास १,६५,००० घरोघरी जाऊन केलेल्या बैठका सत्रांद्वारे भाजप नेत्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला होता. बचते चाय, भाजप ताई' यांसारख्या घोषणाही लोकप्रिय ठरल्या.
पश्चिम बंगालच्या राजकारणात ऐतिहासिक घटना घडली आहे. भाजपचा एक निवडणुकीतील विजय नव्हता, तर सुनियोजित आणि काटेकोरपणे अवलंब केलेल्या प्रचार मोहिमेचा परिणाम होता. हा विजय भारतीय जनता पक्षाचा जमिनीवरील बहुमताचा मार्ग केवळ मोठ्या सभांवर अवलंबून नव्हता. तर प्रत्येक गल्ली, प्रत्येक मतदान केंद्र आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी आखलेली रणनीतीमुळे आला आहे. भाजपची काय रणनीती होती ते जाणून घेऊ.
बंगाल निवडणुकीसाठीचे प्रचार मोहीम, कंटेंट आणि प्रभारी के. के. उपाध्याय यांनी सांगितलं की, भाजपने या निवडणुकीत कमल यात्रेच्या माध्यमातून एक अनोखा प्रयोग केला गेला. हा केवळ एक राजकीय कार्यक्रम नव्हता, तर एक सामाजिक-राजकीय उत्सव होता. यामुळे राजकारणाला सामान्य लोकांच्या जीवनाशी जोडण्यात आले.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या हे मेळाव्यामुळे पक्षाला एक वेगळी ओळख मिळाली. यामध्ये स्थानिक संस्कृती, संगीत, संवाद आणि राजकीय संदेश यांचा संगम केला गेला. राजकारण रंगमंचावरून खाली आणून समाजात आणणे, हे या उपक्रमाचे स्पष्ट उद्दिष्ट होते. पारंपरिक सभांचा प्रभाव मर्यादित असतो, तर कमल मेळ्याने जनतेला सक्षम केले.
बंगालमध्ये फुटबॉल हा केवळ एक खेळ नाही, तर ती एक भावना आहे. भाजपने हीच नाडी ओळखत भाजपने त्याला आपल्या रणनीतीचा भाग बनवला. राज्यभरात फुटबॉल सामन्यांचे आयोजन करून तरुणांना थेट सहभागी करून घेण्यात आले. हा केवळ एक क्रीडा कार्यक्रम नव्हता, तर एक प्रवेशद्वार होता.
या सामन्यांच्या माध्यमातून पक्षाने तरुणांमध्ये भाजपची क्रेझ निर्माण झाली. या सामन्यांमुळे अखंड संवाद, संपर्क आणि पक्षाचे विचार आणि संदेश एकमेकांना देणं शक्य झाले. या सामन्यामुळे पक्षाची अशा ठिकाणांपर्यंत पोहोच निर्माण झाली, जेथे राजकीय पक्षांच्या हालचाली मर्यादित होत्या.
भाजपच्या प्रचार मोहिमेचा सर्वात प्रभावी भाग होता, मतदारांच्या दारापुढील अंगणातील बैठका. फेब्रुवारीमध्ये परीक्षांमुळे स्पीकरवरून प्रचार करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यावेळी पक्षाने या आव्हानाचे संधीत रूपांतर केले. केवळ एका महिन्यात,घरोघरी जात १,६५,००० हून अधिक सभा आयोजित करण्यात आल्या. या बैठकांमुळे नेटवर्क तयार होऊ लागले. अनेकजण व्हॉट्सॲप्स ग्रुपमधून जोडले गेले.
भाजपनं जवळपास प्रत्येक मतदारसंघातील चौकाचौकात बैठका घेतल्या. जवळपास १२ हजार बैठका पक्षाकडून घेण्यात आल्या. जानेवारी ते २७ एप्रिल दरम्यान १२,००० हून अधिक चौकात सभा घेण्यात आल्या. या छोट्या सभांनी मोठ्या व्यासपीठांच्या अभावाची उणीव भरून काढण्यात आली. त्यांनी थेट संवादाला चालना दिली. स्थानिक प्रश्न मांडले आणि दूरवरच्या लोकांपर्यंत पक्षाचा संदेश पोहोचवला. या मॉडेलने निवडणुकांना एका जनआंदोलनात रूपांतरित केले.
१५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान राबवण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेने निवडणुकीच्या प्रचाराल नवीन वळण दिले. २२० विधानसभा मतदारसंघांमधील या प्रचार मोहिमेत १५० हून अधिक नेत्यांनी सहभाग घेतला. त्यात ८० हून अधिक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून राज्य सरकारविरोधी मुद्दे ठळकपणे मांडण्यात आले. या मोहिमेमुळे विरोधी पक्ष बचावात्मक पवित्र्यात आला आणि भाजपला आक्रमक भूमिका घेण्यास मदत झाली.
यावेळी भाजपने उमेदवारी देताना खूप गंभीर्याने विचार केला. अनेक मोठे बदल भाजपने उमेदवारी देताना केलेत. डॉक्टर, वकील, खेळाडू, कलाकार आणि स्थानिक चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली. तरुण आणि महिलांना जोडण्यासाठी युवा शक्ती भरोसा कार्ड आणि मातृ शक्ती भरोसा कार्ड या मोहिमा सुरू करण्यात आल्या. या मोहिमांमुळे थेट संवाद निर्माण करण्यात आला. यामुळे विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.